( अजमेर )
माणसांना चोचले पुरवण्यासाठी वेगवेगळ्या चवींचे पदार्थ लागतात हे माहीत होत, परंतु एखाद्या प्राण्याला चवीचेच पदार्थ लागतात हे पहिल्यांदाच कळल… राजस्थानमध्ये मिठाई व्यावसायिकाने हत्तीला दिवाळीत मिठाई खायला घातली नाही म्हणून चवताळलेल्या हत्तीने दुकानदाराला दुकानाबाहेर ओढुन, सोंडेत धरून आपटलं…फरफटत नेल. सध्या या गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे.
राजस्थानमधील आमेर येथे एक मादी हत्तीण पर्यटकांना पाठीवरून फिरवते. येथील एका मिठाई व्यवसायीकाने तिला नेहमी मिठाई देण्याची सवय लावली होती. तिला मावे की गुंजी ही मिठाई आवडते. दररोज ती दुकानाजवळून जाते. तिथे कुलवाल हे दुकानाचे मालक हत्तींनीला रोज तिची फेव्हरेट मिठाई खायला द्यायचे.
पण दिवाळीच्या दोन दिवस आधी गौरी जेव्हा त्यांच्या दुकानदारावर आली तेव्हा त्याने तिला गोड मिठाई ऐवजी गरमागरम आणि मसालेदार कचोरी खायला दिली. त्यामुळे हत्तीनीला राग आला. ती इतकी चवताळली की तिने दुकानदारावर हल्ला केला. दुकानाची तोडफोड केली. तिने दुकानदाराला सोंडेत धरून जमिनीवर आपटलं. त्यानंतर त्याला जमिनीवरून फरफटत नेलं. त्यानंतर जमलेल्या लोकांनी दुकानदाराला तिच्या तावडीतून सोडवल आणि जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. हत्तीनीच्या जिभेचे चोचले पुरवणे मात्र मिठाई मालकाच्या चांगलेच अंगलट आले.