मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये पिकनिकसाठी गेलेल्या कुटूंबाचा दुर्दैवी अपघात झाला आहे. ही घटना रविवार सायंकाळच्या सुमारास घडली आहे. हे कुटूंब पिकनिकसाठी कारमधून सिमरोलजवळ लुधिया कुंड येथे गेले होते. तेथे कार अचानक थेट कुंडात कोसळली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कार कुंडात कोसळताना दिसत आहे. त्यानंतर मदत व बचाव दलाने कुंडाच्या पाण्यातून कारमधील कुटूंबाला बाहेर काढले व त्यांना रुग्णालयात दाखल केले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कार कुंडात कोसळल्यानंतर तेथे किंकाळ्या ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये वाचवा.. वाचवा असा आवाज येत आहे.
रविवारी सुट्टी असल्याने तैयब अली पत्नी झेहरा आणि १२ वर्षांची मुलगी जौनक सोबत कुंडावर आले होते. त्यांच्यासोबत दुसऱ्या गाडीतून आणखी एक कुटूंब आले होते. तैयब यांनीहँड ब्रेक लावून तलावाच्या काठावर कार उभी केली होती व पत्नी व मुलीसह खाली उतरले होते.
#WATCH | Picnickers saved a father-daughter from drowning after a car fell into Lodhia Kund waterfall near Indore, Madhya Pradesh
(Video source: Sumit Mathew) pic.twitter.com/qlKcjQ5GbZ
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 7, 2023
गाडी कुंडाच्या उतारावर उभी केली होती. तलावामध्ये अंघोळ करून कपडे बदलत असताना गाडीचा हँड ब्रेक आपोआपच निघून गेला. यादरम्यान जौनक कारमध्ये एकटीच होती. उतारामुळे गाडी काही वेळातच तलावातमध्ये कोसळली. कार कुंडाच्या पाण्यात पडली. त्यावेळी चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे मुलगी गाडीतून कुंडात पडली. मात्र तिला पोहता येत नव्हते. हे पाहून तेथे गोंधळ उडाला होता. याचवेळी तैयब अली यांनी मुलीला वाचवण्यासाठी कुंडात उडी मारली. तर पत्नी झेहराने पती आणि मुलीला वाचवण्याची विनवणी सुरू केली. त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या काही लोकांनी पाण्यात उड्या घेत मुलीला आणि तिच्या वडिलांना सुखरूप बाहेर काढले