(मुंबई/ क्रीडा प्रतिनिधी)
स्वर्गीय रोहन रमेश जोगळेकर स्मृती चषक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत साई स्वामी समर्थ संघाने ईगल 9 संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजयी व उप विजयी संघाना रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच तिसऱ्या क्रांमांकाचे विजेते स्ट्राईकर्स 11 ह्यांना देखील रोख रक्कम देऊन सन्मानित केले.
भांडुप पश्चिमेच्या पवार पब्लिक स्कूलच्या टर्फ मैदानावर रविवारी खेळल्या गेलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट फलदांज म्हणून राहुल शिंदे (ईगल 9 संघ), गोलंदाज अनिकेत पवार (साई स्वामी समर्थ संघ), तर मालिकावीर विक्रांत परब (साई स्वामी समर्थ संघ), यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी, पारितोषिक वितरण सोहळ्याला माजी आमदार व ईशान्य मुंबई शिवसेना विभाग प्रमुख अशोक पाटील, ईशान्य मुंबई महिला विभाग प्रमुख राजश्री मांदविलकर, भांडुप विधानसभा संघटक नेहा पाटकर, राष्ट्रीय बॅडमिंटनपटू व क्रीडा संघटक दिलीप जोगळेकर, रमेश जोगळेकर, राजन मांदविलकर, अविनाश पाटील, ज्ञानदेव बने ,उन्नती दत्तात्रय पाटील, दक्षता सचिन शिगवण आदी उपस्थित होते. पंच म्हणून मेघनम परब यांनी काम पाहिले. समालोचन सचिन शिगवण, यांनी केले गुणलेखन प्रथमेश डोंगरकर यांनी केले. यावेळी राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू व क्रीडा संघटक दिलीप जोगळेकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रमेश जोगळेकर, रोहन जोगळेकर मित्र परिवार आणि आयोजक, अनिकेत जोगळेकर, विकास जमाले, निमेश बने, ओमकार हळदणकर,भावेश हळदणकर, मनीष म्हाडये, चेतन मांदविलकर, मनीष मांदविलकर यांनी विशेष मेहनत घेतली.