(मुंबई / किशोर गावडे)
स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, एक क्रांतिकारक ,राजकारणी, समाजसुधारक, हिंदू तत्वज्ञ, मराठी भाषेसाठी चळवणीचे प्रणेते, कवी, लेखक म्हणून ओळखले जातात. सावरकरांना हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते तसेच सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे म्हणून ओळखले जातात. सावरकरांनी 1938च्या मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदा हिंदुत्व ही संकल्पना जाहीरपणे मांडली होती. भारत भूमीला जो आपली पितृभूमी अर्थात पूर्वजांची भूमी आणि पुण्यभूमी समजतो तो हिंदू ही संकल्पना सावरकर यांची. ते अत्यंत बुद्धिमान होते, असे गौरवोद्गार माजी आमदार शिवसेना विभाग प्रमुख अशोक पाटील यांनी यावेळी काढले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गौरव यात्रेत सहभागी झाल्यानंतर अशोक पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, समुद्रमार्गे सावरकरांना भारतात आणत होते. बोट मॉर्सेलिस येथे असताना सावरकरांनी समुद्रात उडी मारून फ्रान्सचा किनारा गाठला होता. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. सावरकरांची अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये रवानगी झाली. तिथे त्यांना खड्या बेडीत ठेवायला सुरुवात झाली. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले गेले. या मरणप्राय वेदना सहन करत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर भारताला स्वतंत्र करण्याचेच ध्येय होते. जवळपास 500 मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. 15 आंतरजातीय विवाह लावले. त्यांनी ‘पतित पावन मंदिर’ सुरू केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज कोटक, शिवसेना ईशान्य मुंबई विभाग प्रमुख व माजी आमदार अशोक पाटील, भांडुप भाजपा मंडल अध्यक्ष प्रवीण दहीतूले, माजी आमदार श्याम सावंत, ईशान्य मुंबई महिला विभाग प्रमुख राजश्री मांदविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोषी माता मंदिर व्हिलेज रोड (शिवसेना शाखा) ते हनुमान मंदिर स्काय लॅण्ड महाराष्ट्र नगर पर्यंत काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि तमाम सावरकर प्रेमी जनता उपस्थित होती.