(रत्नागिरी)
भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांचा उल्लेख माफीवीर या अर्थाने केला होता. शिवाय इंग्रजांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर हे पेन्शन घेत होते, अशी टिप्पणी केली होती. या वक्तव्याच्या विरोधासाठी रत्नागिरी तालुका मनसेच्यावतीने तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मजगाव रोड येथील नवकार प्लाझा प्रांगणात आंदोलन करण्यात आले.
यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. शिवाय राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी तालुका मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव, मनसे कामगार सेना जिल्हा चिटणीस सुनील साळवी, तालुका उपाध्यक्ष राजू पासकुडे, विभाग अध्यक्ष अखिल शाहू, अजिंक्य केसरकर, जयेश फणसेकर, उपविभाग अध्यक्ष सुनील पारकर, सतीश खामकर, जयेश दुधरे, शैलेश मुकादम, नैनेश कानेरकर, सुशांत घडशी व अन्य महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.