माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस व विरोधी पक्ष नेते विधान परिषद प्रविणजी दरेकर यांनी चक्रीवादळ नुकसान पाहणी दौऱ्यासाठी आज रत्नागिरी येथे आले होते. यावेळी त्यांनी पतसंस्थेच्या कार्यालयाला भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यानी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ, स्वामी स्वरूपानंद यांची प्रतिमा देऊन सत्कार केला.
पतसंस्थेच्या कामकाजाची सर्व माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी दिली. पतसंस्थेतर्फे कर्जदार, ठेवीदारांसाठी योजना आणि सामाजिक बांधिलकी म्हणून राबवल्या जाणा-या योजनांची माहितीही देवेन्द्र फडणवीस व दरेकर यांनी घेतली. स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेचे आदर्शवत कामकाज पाहून त्यानी समाधान व्यक्त केले. यावेळी देवेन्द्र फडणवीस यांचेसह उपस्थित असलेल्या माजी राज्यमंत्री आमदार रविन्द्रजी चव्हाण , आमदार प्रसादजी लाड, माजी खासदार निलेश राणे यांचाही सत्कार पतसंस्थेमार्फत करण्यात आला.
संस्थेच्या कार्यालयातच नुकसानग्रस्त आंबा व्यावसायिक व मच्छिमार यांची बैठक बोलाविण्यात आली होती. नुकसानग्रस्त शेतकरी व मच्छिमार यांनी आपल्या अडचणी व समस्या देवेन्द्र फडणवीस यांचेसमोर मांडल्या. त्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन देवेन्द्र फडणवीस यांनी आंबा व्यावसायिकांना दिले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष माधवजी गोगटे, प्रसादजी गोगटे, व्यवस्थापक श्री.बापट, उपव्यवस्थापक श्री.रेडीज यांचेसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.