(मुंबई)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने 29 विभागातील 75 हजार पद भरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे. कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये नोकर झाली नव्हती. त्यामुळे देशाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे. येत्या काही दिवसात वेगवेगळ्या विभागाच्या नोकर भरती होणार आहे. पारदर्शकपणे ही नोकर भरती करण्याकडे राज्य सरकारचा विशेष कल आहे.
कोरोना महामारीमुळे नोकर भरतीला घातलेली 50 % ची मर्यादा शिथिल करत आता शंभर टक्के नोकरभरती करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकरने घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णायामुळे शासनाच्या 29 विभागातील 75 हजार पद भरतीचा मार्ग सुकर झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सरकारनं ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्याची मुभा दिली आहे.
कोणत्या विभागात किती होणार नोकर भरती
▪️आरोग्य खाते – 10 हजार 568
▪️गृह खाते – 14 हजार 956
▪️ग्रामविकास खाते – 11,000
▪️कृषी खाते – 2500
▪️सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337
▪️नगरविकास खाते – 1500
▪️जलसंपदा खाते – 8227
▪️जलसंधारण खाते – 2,423
▪️पशुसंवर्धन खाते – 1,047
किती जागा रिक्त?
▪️ गृहविभाग- 49 हजार 851
▪️ सार्वजनिक आरोग्य विभाग : 23 हजार 822
▪️ जलसंपदा विभाग : 21 हजार 489
▪️ महसूल आणि वन विभाग : 13 हजार 557
▪️ वैद्यकीय शिक्षण विभाग : 13 हजार 432
▪️ सार्वजनिक बांधकाम विभाग : 8 हजार 12
▪️ आदिवासी विभाग : 6 हजार 907
▪️ सामाजिक न्याय विभाग : 3 हजार 821
ज्या विभागांचा/कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात यत आहे. ज्या विभाग/कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभाग/कार्यालयांतील गट अ, गट ब व गट क मधील (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे.