रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड आणि ग्रामपंचायत मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान सोहळा व संगीत संध्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी आपल्या मनोगतातून मालगुंड येथील केशवसुत स्मारकात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेला ज्येष्ठ व्यक्तीचा सन्मान सोहळा हा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर या विशेष सन्मान सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य प्राप्त झाल्याचे मत व्यक्त करून आयोजकांनी हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी इंदुराणी जाखड यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षाच्या सन्मान सोहळा व संगीत संध्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांचेसमवेत मालगुंडचे सरपंच दीपक दुर्गवळी, ग्रामविकास अधिकारी नाथा पाटील, तलाठी रोहित पाठक, कार्यकमाचे प्रमुख संयोजक व कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेंद्र शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सोनिया शिंदे, अकरा लाखाची पैठणी विजेत्या रत्नागिरीच्या सुकन्या लक्ष्मी मंदार ढेकणे, कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, कोमसाप युवाशक्तीचे प्रमुख अमेय धोपटकर, मालगुंडचे माजी सरपंच प्रकाश जाधव, विद्याधर तांदळे गणपतीपुळेचे माजी सरपंच महेश ठावरे ,डॉक्टर दीपक थोरात, अमित मेहेंदळे, विलास राणे, मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मधुरा जाधव, संजय पाटणकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या सन्मान सोहळ्यामध्ये मालगुंड गावातील प्रत्येक वाडीतून वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या एका व्यक्तीचा सन्मान करण्यात आला त्यानुसार एकूण 14 जेष्ठ व्यक्तींना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदूराणी जाखड आणि अकरा लाखाची पैठणी विजेत्या रत्नागिरीच्या सुकन्या लक्ष्मी मंदार ढेकणे यांचा यथोचित सन्मान मालगुंड ग्रामपंचायत सदस्या तथा कार्यक्रमाच्या संयोजक सोनिया शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा रत्नागिरी लवर्स ग्रुप निर्मित कार्यक्रमाचे प्रमुख निर्माता संजय पाटणकर आणि संगीत संध्या कार्यक्रमाच्या प्रमुख गायकांचा सन्मान आयोजकांकडून करण्यात आला.
यावेळी सर्वच आलेल्या प्रमुख मान्यवरांनी हा सोहळा अतिशय कौतुकास्पद व अवर्णनीय असल्याचे असल्याच्या प्रतिक्रिया कार्यक्रमाप्रसंगी दिल्या. या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे औचित्य साधून संगीत संध्या हा बहारदार गायनाचा कार्यक्रम रत्नागिरी येथील संजय पाटणकर यांच्या लवर्स ग्रुपने अतिशय सुंदररित्या सादर केला. यावेळी या कार्यक्रमाला रसिकांची मोठी उपस्थिती लाभली होती.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे विद्यमान सदस्य तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिंदे यांच्या विशेष संकल्पनेतून अतिशय नियोजनबद्ध करण्यात आले. यावेळी हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्यांचेसमवेत पत्रकार वैभव पवार, मालगुंड येथील कोमसाप शाखेचे सचिव विलास राणे, ग्रामपंचायत सदस्या सोनिया शिंदे, मालगुंड कवी केशवसुत स्मारक कर्मचारी स्वप्नेश राजवाडकर, कुमार डांगे, अस्मिता दुर्गवळी व अन्य सदस्यांनी अन्य सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. या संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय प्रभावी निवेदन कोमासापाचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे व रत्नागिरी चे सचिन काळे यांनी केले.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !