स्वरानं समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद सोबत लग्न केले आहे. त्यानंतर ही व्यक्ती आहे तरी कोण याचा गुगलवर शोध घेतला जात आहे. स्वरानं देखील यापूर्वी त्या व्यक्तीविषयी कुठेच खुलासा केलेला नव्हता, की त्या दोघांविषयी कोणतीही पोस्ट व्हायरल झालेली नव्हती. आता मात्र थेट त्या दोघांचे लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानं वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
बॉलीवूडची प्रसिद्ध तारका स्वरा भास्कर अखेर विवाहबद्ध झाली. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे, परखड मत प्रदर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं कुणालाही न सांगता, सोशल मीडियावर पोस्ट न करता गुपचूप लग्न केलं आहे. कोर्ट मॅरेज करुन बाहेर पडलेल्या स्वराच्या पतीविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.