(गडनरळ – रत्नागिरी)
सामाजिक क्षेत्रात काम करणार्या तरूण स्वयंसेवक, कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या स्वराज्य युवा प्रतिष्ठान, रत्नागिरी संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील जि.प. मराठी शाळा गडनरळ येथे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.
स्वराज्य युवा प्रतिष्ठान, रत्नागिरी विविध विभागांत योगदान देत असून शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी हितगुज करताना विद्यार्थ्यांना वाचनाची आवड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे बौद्धिक पोषण योग्य रितीने व्हावे हा उदात्त हेतू समोर ठेऊन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शाळेसाठी ५० हून अधिक थोर विचारवंत, राजकीय, आर्थिक व्यवहार आधारित, विनोदी लेखन, छोट्या मोठ्या कथा अशी विविध पुस्तके आश्वासन दिले.
तसेच शाळेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणून शाळेसाठी भव्य गोष्टी घडवून आणण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त केला. या कार्यक्रमास संस्थेचे श्री. मयुरेश चौघुले, रुपेश चौघुले, रितेश धनावडे, त्रिभुवन भातडे, गौरव चौघुले, अक्षय चौघुले, सागर धनावडे, आदित्य धनावडे, अंकुश धनावडे, परेश भातडे, सूर्यकांत चौघुले, शुभम चौघुले आदि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. तसेच कार्यक्रमाला ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माजी विद्यार्थी कार्यकर्ते श्री. अमोल सुनिल चौघुले, श्री. सुरेशजी धनावडे, राज धनावडे, साईराज धनावडे उपस्थित होते. सदर कार्यक्रम उत्तम रितीने पार पाडल्याबद्दल मुख्याध्यापकांनी स्वराज्य युवा प्रतिष्ठान, रत्नागिरी च्या कार्यकर्त्यांचे व उपस्थितांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.