(रत्नागिरी)
रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणात पोलिसांकडून तिघा संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. रत्नागिरी सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांच्या न्यायालयापुढे हा खटला चालवण्यात येत आहे. या खटल्याची पुढील सुनावणी १९ डिसेंबरला होणार आहे.
१ सप्टेंबर २०२२ ला स्वप्नाली सावंत यांचा त्यांचे पती सुकांत सावंत व अन्य दोघांनी घराच्या किचनमध्ये गळा आवळून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी पती सुकांत ऊर्फ भाई गजानन सावंत (वय ४७), रूपेश ऊर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (४३) व प्रमोद ऊर्फ पम्या बाळू रावणंग (रा. सर्व सडामिऱ्या, रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
स्वप्नाली सावंत यांचा खून केल्यानंतर मृतदेह घराच्या मागीच्या बाजूला पेट्रोल टाकून जाळण्यात आला. यानंतर मृतदेहाची राख व हाडेही समुद्रात टाकण्यात आल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले होते. दरम्यान या खटल्याची पुढील सुनावणी आता १९ डिसेंबरला होणार आहे.