(चिपळूण)
तालुक्यातील गाणे खडपोली गावचे सीमेवर दुचाकीच्या अपघातात स्वाराचा मृत्यू झाला. या अपघातात स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत आणि दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र परशुराम राठोड असे मृत्यूमुखी पडलेल्या आणि गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र राठोड हा आपल्या ताब्यातील होंडा युनिकॉर्न मोटरसायकल एमएच 08, एडब्ल्यू 2795 ही चिपळूण ते तिवरे रोड घेऊन जात होता. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत विरुध्द दिशेला जाऊन लोखंडी बोर्डाच्या अँगलला जोराची ठोकर दिली. या अपघातात स्वत:च्या मृत्यूस आणि गाडीच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रवींद्र राठोड याच्यावर भादविकलम 304 अ, 279, 337, 338 मोटरवाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.