रत्नागिरीतील स्थानिक विकास निधीतून कोविड 19 साठी उपचार सुविधा वाढविण्यात येणार आहेत. यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतील एक कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला. याबाबत त्यांनी आज बैठकीत माहिती दिली.
या निधीतून रत्नागिरी आणि राजापूर येथील सरकारी रुग्णालयांचे कामकाज अधिक उत्तम व्हावे, यासाठी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स, रुग्णालयातील खांटाची संख्या वाढविण्यासह फ्रीज व इतर वस्तूंची उपलब्धता होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून खासगी सहकार्यातून 50 ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स रत्नागिरी जिल्ह्याकरिता मिळाले. प्रत्येक मतदार संघासाठी प्रत्येकी 10 देण्यात आले आहेत. रेमडिसीवीर इन्जेक्शनच्या 50 वायल्स आज श्री. सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.
जिल्हा विकास निधी अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयासाठी अद्ययावत डिजिटल व्हिडीओ कॅमेरा आणि एक डिजीटल कॅमेरा खरेदी करण्यात आला आहे. हा कॅमेरा या वेळी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांना प्रदान करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, खासदार विनायक राऊत, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर उपस्थित होते.