जैतापूर वार्ताहर : कोकणात कोणताही प्रकल्प येऊ घातला की सुरुवातीला तयार होते ती प्रकल्प विरोधाचे समिती अनेक तथाकथित निसर्ग प्रेमी येन केन प्रकारे कोकणातील विशेषतः ग्रामीण भागात जाऊन लोकांच्या मनात विष पेरण्याचे काम आणि प्रकल्पाला प्रखर विरोध कसा होईल यासाठी सक्रिय होतात आणि काही गावपातळीवर पुढार्यांना हाताशी धरून संपूर्ण गावाचा आणि पर्यायाने कोकणचा कसा विरोध आहे हे दाखविण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यासाठी आंदोलने उभी केली जातात यातून कोकणी माणसांच्या हाती काहीच लागत नाही नवनवीन नेतृत्व मात्र उदयास येतात आणि आपआपल्या पोटापाण्याची खळगी भरण्याचे उद्योग सुरू होतात . मात्र काही महिन्यांपासून राजापूर तालुक्यात प्रकल्पाच्या समर्थनार्थ अनेक बुद्धिजीवी लोक एकत्र आले आहेत आणि आपल्या तालुक्यामध्ये आणि कोकणात प्रकल्प आले पाहिजे यासाठी संघटीत होत आहेत .
कोकणात कोणताही प्रकल्प आला की त्याला पहिला विरोध हा काळा इतिहास पुसण्यासाठी आता महिलावर्ग ही पुढे सरसावला आहे राजापूर तालुक्यातील नाटे भागातील अनेक महिला आमच्या भागात प्रकल्प आला पाहिजे ,आमच्या मुलाबाळांना इथेच रोजगार मिळाला पाहिजे, आमच्या सर्व लोकांना रोजगार आरोग्य व शिक्षण यासारख्या चांगल्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे आणि यासाठी आयलॉग जेटी असेल ग्रीन रिफायनरी असेल असे प्रोजेक्ट आले पाहिजेत .या प्रकल्पांचे आम्ही स्वागत करीत आहोत अशी भूमिका घेऊन समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत आमचा हा आवाज राज्याचे मुख्यमंत्री सन्मा. उद्धव साहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोच व्हावा यासाठी विनंती करत आहेत .
कोकणामध्ये प्रकल्पांना विरोध आहे अशी भूमिका आतापर्यंत मांडली जात आहे किंवा शासनापर्यंत फक्त विरोधकांचीच बाजू पोहोचवली जात आहे यासाठी नाईलाजास्तव आम्ही समर्थनार्थ आणि आम्हाला हा प्रकल्प हवा आहे ही भूमिका घेऊन रस्त्यावर उतरलो आहोत आता आम्ही केवळ प्रातिनिधिक स्वरूपात उतरलो आहोत परंतु वारंवार जर एनजीओच्या किंवा काही विघ्नसंतोषी पुढाऱ्यांच्या माध्यमातून प्रकल्प घालविण्यासाठी कुरघोडी केली जात असेल तर आम्हालाही मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करायला लागेल अशी भूमिका मांडत या सर्व महिला रस्त्यावर उतरल्या होत्या आणि अपप्रचार करणार्या कोणत्याही एनजीओने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने या भागात फिरकू नये असा इशारा देतानाच प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.
या महिलांच्या आंदोलनामध्ये या भागातील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख ही सहभागी झाले होते. यामध्ये अनेक वर्षे शिवसेनेचे निष्ठेने काम करणारे माजी विभागप्रमुख डॉक्टर सुनील राणे ,विद्यमान उपविभागप्रमुख संतोष चव्हाण ,शाखाप्रमुख महेश कोठारकर, शाखाप्रमुख चंद्रकांत मिराशी,माजी ग्रामपंचायत सदस्य आणि बचत गटांच्या प्रतिनिधी मनाली करंजवकर
ग्रामपंचायत सदस्य श्रुतिका बांदकर, सौ. चव्हाण,सुबोध आंबोळकर, या भागात अनेक वर्ष शैक्षणिक कार्य करीत असलेल्या माजी मुख्याध्यापिका सौ शहाणे , युवासेना शाखा प्रमुख सचिन बांदकर,माजी सरपंच संजय बांदकर, दत्ताराम थलेश्री, सौ. पेटावे,रमेश थलेश्री आदींसह नाटे, राजवाडी येथील प्रातिनिधिक महिला व कार्यकर्ते समर्थनार्थ सहभागी झाले होते.