( रत्नागिरी / प्रतिनिधी )
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्कूल बस परिवहन समितीची नुकतीच बैठक झाली. शाळा सुटल्यावर व शाळेत मुले येताना यांची पाहणी करणे ही शाळेची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक झाली पाहिजे. चालकांकडून नियम पाळले जात आहेत की नाहीत, वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून आणले जात नाही ना, वाहनांची कागदपत्रे व इतर नियमावली पूर्ण असल्याची खातरजमा शाळेने करायची आहे. या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आरटीओ जयंत चव्हाण यांनीदेखील कार्यालयात स्कूल बस चालकांची बैठक घेतली.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, सर्व नियमावलींची पूर्तता करुन सुरक्षित विद्यार्थी वाहतूक करावी, अंमलबजावणी केल्यास कोणतीही कारवाई होणार नाही, मात्र नियमावलीचे पालन न करणार्या स्कूलवर कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम दिला आहे. मात्र नियम पाळू प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही केले आहे. यासंदर्भात एक मार्गदर्शक पुस्तिकाही आरटीओ कार्यालयाकडून पुस्तिकाही आरटीओ कार्यालयाकडून प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेचे वाटप सर्व स्कूल बसचालकांना केले. सर्व शाळांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून नियमावलीबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थी वाहतूक करणार्या सर्व प्रकारच्या वाहनांचा यात समावेश आहे. याविषयी कोणतीही तक्रार असल्यास 02352-229444 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आरटीओ जयंत चव्हाण यांनी केले आहे.