(चिपळूण / वार्ताहर)
शैक्षणिक, सामाजिक चळवळीत सातत्याने पुढाकार घेऊन सेवा कार्य करणाऱ्या व ग्रामपंचायत गटामध्ये, महिला व बालविकास क्षेत्रात विधायक कार्य करणे, तसेच सामाजिक क्षेत्रात हिररीने भाग घेणे, महिला अत्याचाराविरोधात उभे राहणे, महिला स्वयंबचत गट आदी क्षेत्रात पेढांबे-भराडेवाडी मधील सौ.एकता योगेश पेढांबकर यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्का देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामपंचायत माजी सरपंच सौ. पूर्वी जाधव, उपसरपंच श्री. राजेंद्र कदम, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रथमेश शिंदे, सदस्या सौ.विजया पेढांबकर ग्रामसेवक श्री. व्ही. बी. गुरव, बँक सखी सौ.गौरी शिंदे, पत्रकार व ग्रामपंचायत तंटामुक्ती सदस्य श्री. योगेश पेढांबकर यांच्या उपस्थितीत यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप म्हणून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ रोख रक्कम असे सौ.एकता योगेश पेढांबकर यांना देण्यात आला. सदर पुरस्कार सोहळा हा ग्रामपंचायत पेढांबे कार्यालयात येथे संपन्न झाला.
कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवराचे स्वागत करण्यात आले.उपसरपंच श्री. राजेंद्र कदम, माजी सरपंच सौ.पूर्वी जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रथमेश शिंदे, सदस्या सौ.विजया पेढांबकर ग्रामसेवक श्री. व्ही. बी. गुरव, बँक सखी सौ.गौरी शिंदे, पत्रकार व ग्रामपंचायत तंटामुक्ती सदस्य श्री. योगेश पेढांबकर, संकल्प ग्रामसंघ पदाधिकारी सौ.शितल सुधाकर शिंदे, सौ.अश्विनी आशिष शिंदे, सौ.रजनी राजेंद्र कदम, सौ.पुजा प्रदिप शिंदे, सौ.शालिनी संतोष शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उपस्थित ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, आशासेविका, महिला बचत गट, सदस्या आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रामसेवक श्री. व्ही. बी. गुरव यांनी केले. सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.