(नवी दिल्ली )
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दलातील जवान आणि इतर सशस्त्र दलातील ४१२ जणांना शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. यात ६ जणांना कीर्ती चक्र (चार मरणोत्तर), १५ जणांना शौर्य चक्र (दोघे मरणोत्तर), एक बार टू सेना पदक, ९२ जणांना सेना पदके (४ मरणोत्तर), एक नौसेना पदक (शौर्य), ७ वायू सेना पदके (वीरत्व), २९ परम विशिष्ट सेवा पदके, तीन उत्तम युद्ध सेवा पदके, एक बार टू विशिष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आली.
या खेरीज ५२ जणांना अति विशिष्ट सेवा पदक, १० जणांना युद्ध सेवा पदक, दोघांना दोनदा सेना पदक, ३६ जणांना सेना पदके, ११ जणांना नौसेना पदके (तीन मरणोत्तर) १४ जणांना वायू सेना पदके, दोघांना दोनदा विशिष्ट सेवा पदक आणि १२६ जणांना विशिष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले.
कीर्ती चक्र
मेजर शुभंग (डोग्रा रेजिमेंट, ६२ वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स)
नायक जितेंद्र सिंह (रजपूत रेजिमेंट, ४४ वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स)
रोहीतकुमार (कॉन्स्टेबल, जम्मू आणि काश्मीर पोलिस) (मरणोत्तर)
दीपक भारद्वाज, (उपनिरीक्षक) (मरणोत्तर)
सोधी नारायण, (हेड कॉन्स्टेबल) (मरणोत्तर)
श्रावण कश्यप, (हेड कॉन्स्टेबल) (मरणोत्तर)
शौर्य चक्र
मेजर आदित्य भदौरिया
कॅ. अरुणकुमार
कॅ. युद्धवीर सिंह
कॅ. राकेश टी.आर
नायक जसबीर सिंग (मरणोत्तर)
लान्स नायक विकास चौधरी
कॉ. मुदासिर अहमद शेख, (मरणोत्तर)
फ्लाईट ले. तेजपाल
ग्रुप कॅप्टन योगेश्वर कृष्णराव कंदाळकर
स्क्वाड्रन लिडर संदीपकुमार झझ्झरीया
सीपीएल आनंद सिंह
एलएसी सुनीलकुमार
सत्येंद्रसिंह (असि. कमांडंट)
विक्कीकुमार पांडे (डेप्यु. कमांडंट)
विजय ओराओन (कॉन्स्टेबल)
विशिष्ट सेवा पदक
ब्रि. अजित महेंद्र येवले, मराठा लाइट इन्फंट्री
मे. जनरल नितीनराम इंदूरकर
मेजर जनरल रंजन महाजन
मेजर जनरल राजेंद्र जोशी
कर्नल संदीप अरंिवद पेंडसे
ले. कर्नल रेणुका हरणे
कर्नल सचिन. एस. महाडीक
कर्नल दीपक पलांडे
कमोडोर प्रशांत शिधये
ग्रुप कॅ. सुधीर यादव
बार टू सेना पदके
मेजर राकेशकुमार
सेनापदके
मेजर सुजय घोरपडे
मेजर प्रथमेश प्रदीप जोशी
बार टू विशिष्ट सेवा पदके
रवींद्रकुमार अंदुरे