(रत्नागिरी)
सैतवडे बौध्दजन ग्रामस्थ पंचायत, आदर्श महिला मंडळ व त्रिशरण फाउंडेशन ट्रस्ट जय भीमनगर यांच्या वतीने त्रिशरण बुद्ध विहार येथे वर्षावास कार्यक्रमाच्या प्रारंभापासुन रात्री आठ वाजता नियमित सुत्रपठण, ध्यानसाधना व मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन नगरातील प्रत्येक व्यक्ती येऊन वाचतात आणि आपल्या यथाशक्ती दान करुन पुण्यअर्जित करतात. रत्नागिरी पाली येथील मेडीटेशन सेंटरचे संचालक विप्पसना साधक संतोष आयरे यांनी सैतवडे जय भीम नगर येथे येऊन विपस्सना आणि ध्यान याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
वर्षावास काळात उपासक उपसिकाना भगवान बुद्धांचेअनमोल विचार विहारात श्रवण करता यावे. धम्ममय भारत मिशनचे कार्य ज्या भिक्कू संघाच्या(भंते एम सत्यपाल महाथेरो, भंते ग्यांरक्षित थेरो, भंते करुणानंद थेरो, भंते एन धम्मानंद थेरो, भंते धम्मबोधी थेरो) अशा असंख्य भंतेच्या सुमधुर वाणीद्वारे सुरु आहे, ती अनमोल वाणी जास्तीत जास्त लोकांनी श्रवण करावी त्याचा लाभ सर्वांना व्हावा यासाठी चव्हाण परिवाराकडून त्रिशरण बुध्द विहार सैतवडे जयभीम नगर ता. जि. रत्नागिरी करीता टीव्ही सेट आजच्या श्रावण पौर्णिमा उपोसथ दिनी दान करुन स्थानिक कमिटी उपस्थितांना समर्पित करण्यात आला.