(संगमेश्वर)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस देशभरामध्ये सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात आला. “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा”मध्ये तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुक्याच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. सदर पंधराव्या अंतर्गत संगमेश्वर शहर भारतीय जनता पार्टी यांनी सत्कार करण्यात आले . सदरचा कार्यक्रम गणेश पवार यांच्या सहकार्यातून करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुक्यामध्ये रुजवणे मध्ये मोलाचे योगदान देणारे श्रीपाद सामंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच भारतीय जनता पार्टी देवरुख मधील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री मुकुंद जोशी व श्री नामदेव बने यांचाही सत्कार करण्यात आला. संगमेश्वर मधील साखरपा परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी काम करणारे श्री सुरेश शेठ गांधी व श्री विजय गांधी यांचा हे सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते प्रमोद शेटये यांनी भारतीय जनता पार्टीतील सत्कारमूर्तींचे योगदान यावर सविस्तर मार्गदर्शन केले व जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी गोविंद भिडे, हरीभाई पटेल, दीपक वेल्हाळ यांनीही आपल्या भाषणामध्ये भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याला आपल्या भाषणातून अनुभवांचे कथन केले. या वेळी सत्कारमूर्तीने त्यांनी केलेले कार्य, त्या वेळेच्या कठीण परिस्थितीमध्ये पक्षाचे काम निष्ठेने कसे केले व मोदी यांनी भारतासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले व नवीन कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शनही केले.
यावेळी अमित सामंत यांनी भाजपा परिवाराने सत्कार केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी संगमेश्वर शहराचे आभार व्यक्त केले, तसेच अमित सामंत यांनी भारत सरकार व राज्य सरकार यांच्या योजनांवर लिहिलेल्या पुस्तकाचे पुस्तकाची प्रत भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते मुकुंद जोशी यांच्याकडे दिली व वेळोवेळी योजना संदर्भात मार्गदर्शन करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी मुकुंद जोशी व सुरेश शेठ गांधी यांनी भारतीय जनता पार्टी संगमेश्वर शहरचे आभार मानले व मुलाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमासाठी गोविंद भिडे यांनी हॉल उपलब्ध करून दिला. सदर कार्यक्रम डॉ .सुशील कुमार मुळ्ये व अनिल जी घोसाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला. यावेळी दिनेश आंब्रे यांनी आभार मानले व गणेश पवार यांनी कार्यक्रमासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विशेष कौतुक केले.