(रत्नागिरी)
रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची हॅन्डबॅग लांबवून चोरट्याने तब्बल ५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना १६ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ११.५० ते पहाटे ३ वा. कालावधीत पुणे – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये भोके येथे घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, १६ ऑगस्ट रोजी ती पती, बहिण, मेहुणा, बहिणीचा मुलगा असे मिळून वडकांचेरी जिल्हा त्रिशूर केरळ येथे बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी पुणे – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान हे सर्वजण झोपले असता त्यांची गाडी रत्नागिरीजनीक भोके येथे आली असता अज्ञाताने त्यांच्या झोपेचा फायदा उठवत हँडबॅग लांबवली.
या बॅगेमध्ये रोख २ लाख २८ हजार रुपये, ३ लाख १६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने त्यामध्ये बांगड्या, पेंडल, कानातील जोड, डायमंड रिंग आणि १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ५ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी रविवार १५ ऑक्टोबर रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.