(रत्नागिरी)
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांचा मान्यतेने विशाखापट्टणम येथे राष्ट्रीय पातळीवर तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या. सदर स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील कू. अमेय अमोल सावंत यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक संपादन केले. हे यश संपादन करून रत्नागिरी व महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळी पर्यंत पोहचवलीयाने युवा मार्शल आर्ट तायक्वांडो ट्रेनिग सेंटर रत्नागिरी साळवी स्टॉप प्रशिक्षण केद्राचे प्रमुख प्रशिक्षक राम कररा, श्री तेजकुमार लोखंडे ( ब्लॅक बेल्ट 2दान), श्री अमित जाधव ( ब्लॅक बेल्ट 1दान), युवा पदाधिकारी यांनी पुष्गुच्छ देऊन अमेय सावंत यांना शुभेच्छा दिल्या