(देवरूख / सुरेश सप्रे)
डिंगणी चाळके वाडीतील सुभेदार चाळके चॅरिटेबल व ग्रामपंचायत पिरंदवणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत केंद्र शाळां डिंगणी अंतर्गत 10 जिल्हापरिषद शाळांच्या 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उस्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेच्यावेळी नासा अंतराळ परीक्षेत यश संपादन केलेल्या विध्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे खाडी विभाग प्रमुख व कोंड्ये सरपंच महेश देसाई, पिरंदवणे सरपंच तथा उपविभाग प्रमुख विश्वास घेवडे, युवक विभाग प्रमुख मुझम्मील मुजावर, युवक विभाग प्रमुख विश्वास दसम, डिंगणी सरपंच समीरा खान, डिंगणी शाखाप्रमुख विशाल कदम, वामन जी काष्टे, प्रभाकर घेवडे, बिट विस्तार अधिकारी त्रिभुवणे, केंद्र प्रमुख जाधव, मुख्याध्यापक संदेश सावंत तसेच वैभव थरवळ, शितल मनवे, रमेश मनवे, मधुकर वाजे, संजय तटकरे , मनीषा चव्हाण, सुनील खापरे, संतोष चव्हाण, शिवप्रसाद गड्डमवार, गणेश जगदाळे, गड्डमवार मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पिरंदवणे आधी मान्यवर उपस्थित होते. केंद्रस्तरीय शाळांच्या विद्यार्थ्यांना जी काही मदत लागेल आपण करायला तयार आहोत, असं आश्वासन ट्रस्टचे संस्थापक आणि सचिव सुधीर चाळके यांनी दिले.
विस्तार अधिकारी यांनी ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक करत ट्रस्टच्या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पिरंदवणे सरपंच यांनी ग्रामपंचायत पिरंदवणे व शाळा व्यवस्थापन समिती तसेच सुभेदार चाळके चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सुधीर चाळके यांचे आभार मानले.