(गुहागर)
महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेला आणि महाराष्ट्रसह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना अपात्रतेचा निकाला लागला. हा निकाल “मिलीभगत” निकाल होता. मात्र कोर्टाचा निकाल जानेवारीच्या अखेरपर्यंत लागेल त्या आधीच मुख्यमंत्री आपला राजीनामा देतील. त्यांनी आताचं मरण पुढे ढकलले आहे. सरकारला नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका घ्यायला भिती वाटत आहे. जनता यांच्या विरोधात निकाल देईल. यामुळेच या सर्व निवडणुका सध्यातरी थांबवल्या आहेत. असे विधान शिवसेना नेते, माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी श्रृंगारतळी येथे झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटाच्या सभेमध्ये केले.
मला गणितं तुमच्या समोर सांगायची आहेत. वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडायची आहे. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. त्यातील तीन राज्यांमध्ये भाजप सत्तेवर आली. तेलंगणामध्ये कॉंग्रेस जिंकली काँग्रेसचे सरकार आले. मिजोराममध्ये प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले. आपल्याला सांगितला जात आहे. भाजपची सत्ता आली पुन्हा मोदींची लाट आली तर काही लाट वगैरे आलेली नाही. तीन राज्यात भाजपची सत्ता आहे हे सत्य आहे. मात्र ते अर्ध सत्य आहे. आकडेवारी आपल्यासमोर कोणी ठेवत नाही. ही आकडेवारी लोकांसमोर गेली पाहिजे या तीन राज्यांमध्ये भाजपला मिळालेली मते ४१ टक्के आहेत. आणि कॉंग्रेसला मिळालेली मते साडे एकोणचाळीस टक्के आहेत हे सत्य आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? फक्त दीड टक्क्याच्या मताने भाजप जिंकली. आता एन.डी.ए आघाडीला एकत्र यावे लागेल व याचा बोध घ्यावा लागेल, कॉंग्रेसने याचा बोध घेतला आहे. माझ्या माता भगिनींसाठी या सरकारने उज्वला योजना आणली ती फक्त कागदावरच! सिलेंडरचा वापर माता, भगिनी चूल पेटविताना सिलेंडर आडवा करून बसण्यासाठी घेतात.
सुनील तटकरे यांनी घर फोडलं, त्यांना गाडायचंय… खळबळजनक दावा
ठाकरे गटाचे नेते अनंत गिते यांनी मोठं आणि धक्कादायक विधान केलं आहे. मी भाग्यवान आहे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच लोकसभेच्या उमेदवारीची उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केली आहे. सुनील तटकरेंना निवडणुकीत गाडायचं आहे. सुनील तटकरे यांनी माझं घर फोडलं. त्यामुळे मला तटकरेंना निवडणुकीत गाडायचं आहे, असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं असून त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे माझ्या नावाची शिफारस केली आहे, असा खळबळजनक दावा अनंत गिते यांनी केला आहे. गिते यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.