(ऑटो)
भारतात अनेक कंपन्यांच्या कार बाजारात उपलब्ध आहेत. पण सुझुकी कंपनीच्या कार आजही ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहेत. सुझुकी कंपनीच्या अनेक कारला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद दिला जात आहे. या कंपनीच्या कार सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार आहेत. सुझुकी कंपनीच्या कार सर्वाधिक मायलेज आणि कमी किमतीमुळे ग्राहकांना चांगल्या आकर्षित करत आहेत. सुझुकी कंपनी सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. आता या कंपनीची एक कार नंबर वन ठरली आहे. सर्वाधिक पसंती मिळत असलेल्या कारमध्ये सुझुकीच्या स्विफ्ट आणि वॅगनआरचाही समावेश आहे.
सुझुकी कंपनीकडून एक नवीन कार गेल्या काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आली आहे. ही कार कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. तसेच ३१ किमी मायलेज देखील देत आहे. त्यामुळे भारतात या कारला सर्वाधिक पसंती मिळत आहे.
या कारला सर्वाधिक पसंती मिळत आहे
गेल्या काही दिवसांपासून भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारला ग्राहकांमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या भारतमध्ये कॉम्पॅक्ट सुदान कारच्या विक्रीवर बंदी आहे. पण भारतीय लोकांना सुझुकी कंपनीची ही कार सर्वाधिक पसंत असल्याचे बोलले जात आहे. भारतातील ग्राहकांमध्ये या कारबद्दल खूपच उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे या कारचा भारतामध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 5 कारमध्ये समावेश करण्यात आला आहे.
सुझुकी या कारचे नाव “बलेनो” आहे. आता अनेकदा तुम्ही प्रवास करताना बलेनो ही कार पहिली आहे. सर्वाधिक विकली जाणारी कार म्हणून बलेनोकडे पाहिले जाते. बलेनो ही कार मायलेजच्या बाबतीत देखील सर्वाना मागे टाकत आहे.
गेल्या महिन्यात भारतात या कारचे 18,592 युनिट्स विकले गेले आहेत. गेल्या वर्षभरात या कार विक्रीचा आकडा केवळ 12,570 होता, म्हणजे या वर्षी भारतात बलेनोच्या 6,022 युनिट्सची अधिक विक्री झाली.
सुझुकी कंपनीची बलेनो कार 31 किलोमीटर मायलेज देत आहे, जी ग्राहकांसाठी एक मोठी गोष्ट आहे. सुझुकीची ही एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. बलेनो ही कार भारताची नंबर वन कार बनली आहे.
वैशिष्ट्य
सुझुकी बलेनोमध्ये तुम्हाला 1.2L 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळते जे 89bhp आणि 113NM टॉर्क जनरेट करते, यामध्ये तुम्हाला AGS गियरबॉक्स, 6 एअरबॅग्ज, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम मिळेल.
हिल कंट्रोल, ईबीडी सिस्टम या सर्व फीचर्ससह तुम्हाला या कारमध्ये 9 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम, 360 व्ह्यू कॅमेरा यांसारखे उत्कृष्ट फीचर्स देखील देण्यात आले आहेत. या कारच्या बेस मॉडेलची किंमत 6.49 लाख रुपये आहे.