(रत्नागिरी)
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात ‘ग्रंथसखा’ पुरस्कार वितरण, तसेच विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा व पुस्तक परीक्षण स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शनही आयोजित केले होते. विविध शाळांमधून 350 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
‘मी प्रदर्शनात पाहिलेली पुस्तके’, ‘पुस्तके माझे मित्र’ व ‘मला आवडलेले पुस्तक’ या विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शाल्मली प्रसाद रांजणकर, सुमुख सचिन काळे व ओजस महेश शिवलकर यांना अनुक्रमे एक ते तीन क्रमांक देण्यात आले तर खुशी शिरधनकर तिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
पुस्तक परीक्षण स्पर्धेमध्ये शार्दुल साळवी याला प्रथम क्रमांक, आर्वी ज्ञानेश कुलकर्णी हिला द्वितीय क्रमांक, आर्या कारेकर यांना तृतीय क्रमांक तर नंदिता हळदणकर शुभवी गानू, कुमार ओम भारती यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले. ग्रंथसखा पुरस्कार सोहळा हा सातत्याने दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आला होता. सातत्यपूर्ण आणि विविध विषयांवर वाचन करणाऱ्या अकरा वाचकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार श्री. शिरीष दामले, डॉक्टर निनाद नाफडे, श्री. श्रीकांत रिझबुड, श्री.आनंद तापेकर, श्री. प्रवीण रेडीज, सुमन कोलपटे, किमया घुडे, संजय शिवलकर, जमीर तांबोळी , अॅड. श्रीकांत भाटवडेकर या वाचकांचा यावेळी ग्रंथसखा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी ग्रंथसखा पुरस्कार प्राप्त वाचकांनी आपल्या जीवनात पुस्तकाचं महत्व आणि वाचनालयाचे महत्व अनन्य साधारण असल्याचे आवर्जून सांगितले. त्याच वेळी वाचनालयाचे जुने सभासद श्री. श्रीकांत रिसबुड यांनी वाचनालयाला देणगी म्हणून रुपये 5000/- मात्र चा धनादेश अॅड. दीपक पटवर्धन यांच्याकडे सुपूर्द केला.
याप्रसंगी बोलताना वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी पुस्तक आणि वाचक हे ऐवज ग्रंथालयासाठी खूप मौल्यवान आहेत. वाचन संस्कृती प्रवाहित ठेवण्यासाठीच्या उपक्रमांना वाचकांचा प्रतिसाद मिळवण्यासाठी वाचनालय सतत प्रयत्नशील आहे. वाचनालय ही स्वतंत्रपणे चालवली जातात. वाचनालयासाठी आर्थिक सहाय्य देणेसाठी समाज घटकांनी पुढे यावं. ‘सर्वात जुने पण सर्वात अद्ययावत वाचनालय’ अशी ओळख निर्माण करण्यात काही अंशी यश आलंय. सुज्ञ वाचकवर्ग ही दौलत जपणे मह्त्वाचे आहे. सूज्ञ वाचकांचा ग्रंथकट्टा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यात सहभगी होण्याचे आवाहन पटवर्धन यांनी केले.
सुमुख काळे या लहानग्याने ‘मी वाचलेले पहिले पुस्तक -अंकलिपी’ हा लिहिलेला निबंध खूप उद्बोधक असल्याच सांगत विद्यार्थ्यांना वाचनालयात येऊन ग्रंथमैत्रीसाठी पालक शिक्षक यांनी पुढाकार घेण्याची आवाहन करत वाचनालय शाळा शाळा मध्ये फिरते. वाचनालय ही संकल्पना राबवण्याची योजना तयार करत असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी संगितले. तसेच वाचनालयात मनपसंत पुस्तक खरेदी साठी उपलब्ध आहेत. दिवाळी पासून ग्रंथालयाच्या प्रांगणात पुस्तक विक्रीचा कायम स्टॉल सुरू करणार आहोत असं सांगत वाचनालया पुढची आव्हाने नवे उपक्रम या बाबतही उहापोह केला.
या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष संतोष प्रभू, कार्यवाह आनंद पाटणकर व मालती खवळे, सदस्य शेखर पटवर्धन, आणि वाचनालयाचे सर्व कर्मचारी तसेच पालक विद्यार्थी आणि ग्रंथसखा पुरस्कार विजेते वाचक उपस्थित होते.