(खेड/ प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील सुकीवली येथील लुम्बिनी बौद्ध विहार येथे मुंबई येथून दाखल झालेल्या ३० भिख्खू संघाने विहारास भेट देत मुख्य रस्ता ते लुम्बिनी बौद्ध विहार अशी पदयात्रा ‘बुद्ध सरण गच्छामि’ च्या नामघोषात काढून परिसर मंगलमय बुद्ध वाणीने निनादून गेला.
निमित्त होते श्रामणेर संघाला भोजनदान व धम्म देसना कार्यक्रमचे खेड तालुक्यातील .डी.एन.मोरे, माजी श्रामणेर व केंद्रीय शिक्षक गिरीश गमरे, व खेड तालुका बौध्द समाज सेवा संघ शाखा क्रमांक २५ सुकिवली, आम्रपाली महिला मंडळ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला समारंभ संपन्न करणेकामी स्थानिक शाखेतील पदाधिकारी व महिला उपासिका यांनी परिश्रम घेतले.
श्रामणेर संघाचे संघ प्रमुख भन्ते विशुध्दीबोधी यांनी यावेळी उपस्थित उपासक उपासिका यांना धम्म देसना दिली. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा शाखा रत्नागिरी येथील केंद्रीय शिक्षक संजय कांबळे तसेच जिल्हा संस्कार विभाग सचिव अल्पेश सकपाळ तसेच दि. बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा खेडचे अध्यक्ष बी.एस.पवार, सरचिटणीस रमण तांबे, कोषाध्यक्ष अरुण मोरे उपाध्यक्ष देवदत्त हळदे के.टी. गायकवाड अध्यक्ष शहर शाखा देवानंद यादव ( माजी अध्यक्ष ) समता सैनिक दल चे समिर रुके, राजेश धोत्रे, तन्वी मोरे, पवार, तसेच मंडणगड तालुका पदाधिकारी हर्षद जाधव प्रमोद सकपाळ, प्रफुल्ल खैरे, दिपक धोत्रे यांच्या सह स्थानिक शाखेचे अद्यक्ष मनोहर जाधव, संघ उपाध्यक्ष किरण जाधव, अजित जाधव यांच्यासह आम्रपाली महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्पेश सकपाळ यांनी केले. आभार प्रदर्शन स्थानिक शाखा क्रमांक २५ सुकिवलीचे सरचिटणीस नंदकुमार जाधव यांनी केले.