(रत्नागिरी / वार्ताहर)
भारताच्या इतिहासावर छाप निर्माण करणाऱ्या व महिलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करून कर्तृत्वाची भरारी घेण्यास पंख देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील श्रीकांत उर्फ भाई शेठ मापुसकर ज्युनिअर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्राध्यापक सुभाष रानमाळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक सुभाष रानमाळे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांच्या कर्तुत्ववान कार्यामुळेच आजपर्यंत देशात पंतप्रधान, राज्यपाल, विविध खेळाडू, डॉक्टर अशा विविध पदांवर महिलांनी जबाबदारी पार पाडली. त्यामुळे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षांची प्रेरणा प्रत्येक विद्यार्थ्याने घेतली पाहिजे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
दरम्यान जयंती निमित्ताने शिक्षणाचे महत्त्व सांगणारा ‘श्यामची शाळा’ हा चित्रपट देखील सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राध्यापक उपस्थित होते.
फोटो : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना प्राध्यापक सुभाष रानमाळे सर आणि विद्यार्थिनी दिसत आहे.