सोशल मीडियातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशनमध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुक या अॅप्लिकेशनचा समावेश होतो. बऱ्याचदा सोशल मीडियावरील फेक अकाऊंटचे प्रमाण वाढल्याने हॅकिंग सारखे प्रकार सातत्याने घडताना दिसत आहेत. फेसबुक हॅक झाल्यावर आपल्या अकाउंट वरून चुकीचे वा बदनामीकारक मेसेज पाठवले जातात. अनेकवेळा आपल्या नातेवाईक, मित्र मंडळीना मेसेज पाठवून थेट पैशाची मागणी केली जाते. फेसबुकवरील अकाउंट हॅक झाल्यास काय करावे कळत नाही. मात्र, अशा वेळी घाबरून न जाता हे हॅकिंग कसे रोखले जाऊ शकते त्याबद्दल जाणून घ्या…
फेसबुक हॅक झाले तर ….
जगात फेसबुकचे २ अब्ज ९३ कोटी तर देशात २४ कोटी युझर्स आहे. पण जर फेसबुक वापरताना कधीतरी तुमचं अकाऊंट हॅक झाले तर, पासवर्ड अँड सिक्युरिटी या पेजवर जाऊन पुढील बाबी तपासता येतील. फेसबुक अकाउंट कोणत्या डिव्हाइसशी जोडले गेले आहे, कुठल्या डिव्हाइसमध्ये तुम्ही लॉग-इन आहात इत्यादी. एखाद्या अनोळखी डिव्हाइसवर तुम्ही लॉग इन असल्याचे तुम्हास आढळले तर तातडीने ते डिव्हाइस तुमच्या अकाउंट सिस्टीममधून काढून टाका.
फेसबुक अकाउंटच्या सेटिंग्ज आणि प्रायव्हसी सेक्शनमध्ये जा.
तिथे पासवर्ड आणि सिक्युरिटी हे पर्याय असतील ते निवडा
त्यामध्ये ‘चेंज पासवर्ड’ हा पर्याय निवडून पासवर्ड बदला.
हॅकिंगपासून संरक्षण करण्यासाठी काळजी
- पासवर्ड सुरक्षित ठेवा
- पासवर्ड वारंवार ठराविक कालावधीसाठी बदलत रहा
- तुमचा पासवर्ड हा कोणालही शेअर करू नका