सायबर गुन्हा प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे सतर्कता बाळगणे प्रत्येकालाच महत्त्वाचे झाले आहे. नाहीतर एक चूकीचे क्लिक आपले बँक खाते रिकामे करु शकते. आता एचडीएफसीचे ग्राहक या हॅकर्सच्या रडारावर आहेत. त्यामुळे जर तुम्ही एचडीएफसीचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या सायबर हॅकर्सच्या निशाण्यावर एचडीएफसीचे ग्राहक असल्याचे समोर आले आहे.
सायबर सेलमध्ये दररोज बँकिंग अथवा डिजिटल पेमेंट फ्राॅडशी निगडित अनेक प्रकरणांची नोंद होते. स्टॅटेस्टिकाच्या अहवालानुसार, २०२१ मध्ये संपूर्ण भारतात आॅनलाईन बँकिंग फ्राॅडच्या प्रकरणांमध्ये ४,८ हजार पेक्षा अधिक प्रकरणे समोर आली आहेत.
स्कॅमर्स अनेक प्रकारे पैसे चोरू शकतात. पण त्यातही फिशिंग एसएमएस या प्रकाराने स्कॅमर्स लोकांची फसवणूक करतात. फिशिंग बँक एसएमएस द्वारे बँक खाते सस्पेंड झाले आहे. ते पुन्हा चालू करण्यासाठी एसएमएसमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करुन ईकेवायसी अथवा पॅनकार्ड अपडेट कऱण्यास सांगितले जाते. या प्रकारात एखाद्या व्यक्तीने या एसएमएसवर क्लिक करुन लिक ओपन केल्यास त्याचा फोन हॅक होतो आणि त्याच्या खात्यातील सर्व पैसे गायब होतात.
नुकतेच एचडीएफसीने आपल्या ग्राहकांना अशा फिशिंग एसएमएससंदर्भात अलर्ट केले आहे. तर काही यूजर्सनी बँकेलाच टॅग करुन अशा प्रकारच्या एसएमएसची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी फिशिंग एसएमएसबद्दल माहिती दिली आहे. या गंभीर घटनेची दखल घेऊन एचडीएफसीने खातेदारांना सूचित केले आहे. असा कोणत्याही प्रकारचा एसएमएस बँकेने पाठवला नसून ग्राहकांनी उत्तर देऊ नये. ग्राहकांशी संपर्क ठेवण्यासाठी एचडीएफसी बँक त्यांच्या संकेतस्थळावरुनच संपर्कात राहते असा अधिकृत मेसेज बँकेने ट्विट केला आहे.