( कोल्हापूर )
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असताना झिका व्हायरसने सगळ्यांचे टेन्शन वाढवले आहे. मुंबईतील चेंबूरमधील एक वृद्ध महिला गेल्या महिन्यात झिका व्हायरसची शिकार झाली होती. यानंतर आता कोल्हापुरात झिका व्हायरसने एन्ट्री केली. इचलकरंजीत झिका व्हायरसचे तीन संशयित रुग्ण सापडले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णांमध्ये एक जण पेशाने डॉक्टर असल्याची माहिती आहे.
पहिला रुग्ण हे ३८ वर्षीय पुरूष असून न्युरोफिजिशियन आहे, त्याचे स्वतःचे क्लिनिक आहे. ते देवदर्शनासाठी कोकणात गेले होते. गाडी पार्किंग करताना त्यांना मोठ्या प्रमाणात डास चावले. यामुळे ते आजारी पडले. त्यांनी रक्ताची तपासणी केली असता त्यांच्यामध्ये झिका सदृश्य व्हायरस आढळून आला. या पाठोपाठ शुक्रवारी (२ सप्टेंबर २०२३) दोन रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा साथरोग कक्षाने दिली.
दुसरा रुग्ण झेंडा चौक येथील महिला आहे. तर, तिसरा रुग्ण कागवडे मळा येथील पुरूष आहे. या दोन्ही रुग्णांना अलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी ६ व्यक्ती राहत आहेत. त्यापैकी तिघांचे रक्तजल नमुने तपासणी करीता घेतले आहेत.इचलकरंजी काडापुरे तळ शळके भवनजवळ भागामध्ये सर्वेक्षणादरम्यान ७ जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. यामध्ये एक गरोदर महिला आणि विनालक्षण असलेले ६ जण आहेत.