गाझियाबाद येथील एका कान, नाक आणि घसा रोग तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टरांनी आपल्या निरिक्षणात पिवळ्या बुरशीजन्य आजाराचा रुग्ण आढळल्याची बाब स्पष्ट केली आहे. आतापर्यंत काळ्या आणि पांढऱ्या बुरशीचे रुग्ण समोर आल्यामुळे देशावर आणखी एक संकट ओढावत असल्याची बाब चिंतेत टाकून गेली, त्यातच आता हे पिवळ्या बुरशीचे प्रकरण नव्याने समोर आल्यामुळे आरोग्य क्षेत्राची डोकेदुखी आणखी वाढणार का, हाच प्रश्न उदभवत आहे. ही बुरशी काळ्या आणि पांढऱ्या बुरशीपेक्षा अधित धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. स्वच्छतेचा अभाव हे पिवळ्या बुरशीचे मुख्य कारण असल्याची माहिती डीएनएने प्रसिद्ध केली आहे. अनेक दिवसांपासूनचे खाद्यपदार्थ घरात टीकू न देण्याचा सल्लाही या पार्श्वभूमीवर देण्यात येत आहे. घरात असणारा दमटपणाही बुरशीजन्य घटकांच्या वाढीस कारणीभूत ठरतो, त्यामुळे घरात दमट वातावरण टाळा.
पिवळ्या बुरशीची लक्षणे कोणती?
पिवळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास नाक वाहणे, डोकेदुखी अशीच लक्षणे आहेत. परंतु ही बुरशी जखम भरू देत नाही. याचमुळे ही जास्त खतरनाक म्हटली जाते. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, गाझियाबादच्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्याकडे एका रुग्णात तिन्ही प्रकारची बुरशी आढळली. ही पिवळी बुरशी मी माझ्या 30 वर्षांच्या वैद्यकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच पाहिल्याचे ते म्हणाले.
काळ्या आणि पांढऱ्या बुरशीपेक्षा अधित धोकादायक