सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2109 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत ‘कनिष्ठ अभियंता , स्थापत्य अभियांत्रिकी सहायक , लघुलेखक , उद्यान पर्यवेक्षक , सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ , स्वछता निरीक्षक , वरिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , वाहन चालक , स्वच्छक आणि शिपाई ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. PWD अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 2109 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे. https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html या संकेतस्थळावर 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत.
एकूण पदे : 2109
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब अराजपत्रीत) | 532 |
कनिष्ठ अभियंता (विद्युत) (गट ब अराजपत्रीत) | 55 |
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट ब अराजपत्रीत) | 05 |
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (गट क ) | 1378 |
लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब अराजपत्रीत) | 08 |
लघुलेखक (निन्मश्रेणी) (गट ब अराजपत्रीत) | 02 |
उद्यान पर्यवेक्षक (गट क) | 12 |
सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट क) | 09 |
स्वच्छता निरीक्षक (गट क) | 01 |
वरिष्ठ लिपिक (गट क) | 27 |
प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) | 05 |
वाहन चालक (गट क) | 02 |
स्वच्छक (गट ड) | 32 |
शिपाई (गट ड) | 41 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब अराजपत्रीत) | 10 वी + मान्यताप्राप्त विद्यापीठातून तीन वर्षे कालावधीचा स्थापत्य (Civil Engineering) अभियांत्रिकी मधील डिप्लोमा |
कनिष्ठ अभियंता (विद्युत) (गट ब अराजपत्रीत) |
10 वी + मान्यताप्राप्त विद्यापीठातून तीन वर्षे कालावधीचा विद्युत (Electrical Engineering) अभियांत्रिकी मधील डिप्लोमा |
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट ब अराजपत्रीत) |
मान्यताप्राप्त विद्यापीठातून वास्तुशास्त्राची पदवी (B. Arch. ) |
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (गट क ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशात्रीय आरेखक) उत्तीर्ण |
लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब अराजपत्रीत) |
10 वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 100 wpm आणि मराठी टायपिंग 40 wpm |
लघुलेखक (निन्मश्रेणी) (गट ब अराजपत्रीत) |
10 वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 100 wpm आणि मराठी टायपिंग 40 wpm |
उद्यान पर्यवेक्षक (गट क) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी (B. Sc. Agri) |
सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट क) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून वास्तुशास्त्राची पदवी |
स्वच्छता निरीक्षक (गट क) | 10 वी उत्तीर्ण |
वरिष्ठ लिपिक (गट क) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी |
प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिस्ट्री विषयात पदवी / कृषी शाखेतील केमिस्ट्री विषयासह पदवी |
वाहन चालक (गट क) | 10 वी परीक्षा उत्तीर्ण |
स्वच्छक (गट ड) | शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या इयत्ता सातवीतून बढती मिळालेली असावी |
शिपाई (गट ड) | 10 वी परीक्षा उत्तीर्ण |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : 18 ते 55 वर्षे
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
वेतन श्रेणी : 15,000 – 1,32,300/- रुपये
अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट : pwd.maharashtra.gov.in
PWD भरती 2023 अर्ज कसा करावा
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.
सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा PWD-Department-Adv-2023
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा