(मुंबई)
भारतीय नौदलाची ताकद आता अनेक पटींनी वाढणार आहे. कारण आज 23 जानेवारी रोजी आयएनएस वागीर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात तैनात होणार आहे. आयएनएस वागीर ही पाचवी स्कॉर्पीन दर्जाची पाणबुडी भारतीय नौदलाचा सायलेंट किलर म्हणून आयएनएस वागिरला संबोधण्यात येत आहे.
डिझेल इलेक्ट्रिक या दोन्ही माध्यमातून कार्यान्वित असणार आहे. भारतीय नौदलाचे प्रमुख एडमिरल आर हरी कुमार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. ही पाणबुडी माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड आणि फ्रान्सच्या नौदलाच्या संयुक्त कामगिरीने तयार करण्यात आली आहे.
पी 75 या कार्यक्रमातील ही पाचवी पाणबुडी असून या वर्षाच्या अखेरीस नौदलाला या कार्यक्रमातील सहावी आणि शेवटची पाणबुडी मिळणार आहे. फ्रान्सच्या स्कॉर्पिन तंत्रज्ञानाचा ही या पाणबुडीच्या विकासाकरिता वापर करण्यात आला आहे.