(संगमेश्वर)
मोबाईलवर युवापिढी काय बघत आहे. यासाठी पालकांनी जागृत राहिले पाहिजे. तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी करावा तसेच पालकांनी आपल्या मुलांना सायबर क्राईमपासून दूर ठेवावे, असे प्रतिपादन संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश गावित यांनी केले.
संगमेश्वर लोवले येथील नवनिर्माण पब्लिक स्कूलच्या वतीने आयोजित तरंग या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्या किरण गुरव तसेच नूतन खातू उपस्थित होते. विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी केलेल्या कॅटवॉकने सर्वांची मने जिंकली.
हा कार्यक्रम पार करण्यासाठी सहशिक्षक ऋतू नारकर, स्वरा शेट्ये, स्वरा प्रसादे, मानसी कुष्टे, रिया चव्हाण, तैसिन हुजरे, वैष्णवी महाडिक, आरती रणदिवे, अक्षता सरदेसाई यांचे सहकार्य लाभले आहे. दीपप्रज्वलनाने ‘तरंग’चा प्रारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन विद्यार्थी स्वरा मोहिते, हीर पटेल, प्रचिती खरे यांनी केले.