(गणपतीपुळे / वैभव पवार)
चिपळूण येथील सह्याद्री रँडोनिअस आयोजित सायकलिंग स्पर्धेत गणपतीपुळेचा अथर्व विद्याधर शेंड्ये अवघ्या 43 दिवसांत सुपर रँडोनिअर ठरला आहे. कोहिनूर कॉलेज रत्नागिरी येथे प्रथम वर्षात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेल्या अथर्वने अवघ्या 43 दिवसांत 200 किलोमीटर 300 किलोमीटर 400 किलोमीटर आणि600 किलोमीटर असे सायकलिंग चे इव्हेंट दिलेल्या वेळेत पूर्ण करत वयाच्या अठराव्या वर्षी सुपर रँडोनिअर ( एस आर) किताब मिळवला. सायकल घेतल्यापासून प्रयत्नातील सातत्य, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची मिळणारी मदत आणि आई-वडिलांचा पाठिंबा यामुळे मला यश प्राप्त झाले असे अथर्व सांगतो.
अथर्व सोबत रत्नागिरीतील मृत्युंजय उर्फ लाल्या खातू आणि विनायक पावसकर यांनीही सुपर रँडोनिअर (एस आर )हा किताब पटकावला आहे. गेले सुमारे एक वर्षापासून अथर्व रत्नागिरी सायकलिस्ट क्लबशी जोडला गेला. त्यानंतर सायकल घेतल्यापासून क्लब ची मदत त्याला मिळत आहे. तसेच आई-वडिलांचा पाठिंबा असल्यामुळे आपल्याला यश मिळाले असे तो मोठ्या अभिमानाने सांगतो. त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या मनोज भाटवडेकर व सहकाऱ्यांचे भरपूर सहकार्य लाभले. शिवाय बीआरएम दरम्यान चिपळूणचे अहमद अली शेख यांचा ही मोलाचा उपदेश उपयोगी ठरला.
सायकल घेतल्यानंतर फक्त आठ ते नऊ महिन्यातच एस आर झालो. यामागे माझे माझा मित्र एस आर अनुप मेहंदळे (मालगुंड) यांने चांगली तयारी करून घेतली असे अथर्वने सांगितले. 400 किलोमीटरची बीआरएम पूर्ण करताना मध्यरात्री शुगर लेवल कमी झाली होती. पुन्हा बेंगलोर हायवेवर मी एकटाच होतो परंतु न घाबरता मोठ्यांचे सल्ले लक्षात ठेवून सावकाश पुढे जात राहिलो सोबत असलेला सुकामेवा खाल्ला आणि पुढच्या ग्रुपला जॉईन झालो आणि राईट व्यवस्थित पूर्ण झाली असे अथर्वने आपले अनुभव कथन केले.
अथर्वने पाच नोव्हेंबरला बी आर एम सायकलिंग केले केले तर 17 डिसेंबर २०२३रोजी चौथे बीआर बीआरएम पूर्ण केले. त्यानंतर 3 जानेवारी रोजी अथर्वला ईमेलद्वारे इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डकडून (जमशेदपूर झारखंड )रेकॉर्ड नोंदवले गेल्याचे प्रमाणपत्र पाठवण्यात आले. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. घरी आल्यानंतर त्याची आजी व आई-वडिलांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे. अथर्व शेंड्ये ने ही कौतुकास्पद कामगिरी केल्याने त्याचे आईवडील, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि श्री क्षेत्र गणपतीपुळे गावचे नाव रोशन झाले आहे. अथर्वने ही जागतिक विक्रमाची कामगिरी केल्याने संपूर्ण गणपतीपुळे परिसरातून अथर्वचे विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे.