( संगमेश्वर )
संगमेश्वर तालुक्यातील मुरडव गावचे सुपूत्र व सामाजिक कार्यकर्ते विजय राघो कदम यांचा नुकताच रत्नागिरी येथील शामराव पेजे सांस्कृतिक भवन येथे समता पर्व सांगता कार्यक्रमाच्यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
विजय कदम हे स्वतः दिव्यांग असून समाजातील विविध घटकासाठी ते सतत कार्यरत आहेत. आपल्या सामाजिक कार्याबरोबर धार्मिक, सहकार, सांस्कृतिक क्षेत्रातही विशेष असे कार्य करत आहेत.
या सत्काराच्यावेळी किर्ती किरण पुजार (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.रत्नागिरी), शेखर सावंत (उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जि.प. रत्नागिरी), यादव गायकवाड सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण रत्नागिरी, मनोज जाधव, संस्थापक -अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र – रत्नागिरी तसेच अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.