(संगमेश्वर / प्रतिनिधी)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वांद्री कुणबीवाडी येथील मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रदीप लक्ष्मण सनगरे यांनी आदर्श शाळा वांद्री न. 2 येथे अंगणवाडी ते महाविद्यालयीन शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यामध्ये विद्यार्थांना पी.टी.टि शर्ट/लेगा (गणवेश)छत्री, डिजिटल पाटी, पेन, तिरंगा आणि अल्पोपहार तसेच 6 वी ते 15 वी च्या विद्यार्थांना दप्तराचे वाटप करण्यात आले.
प्रदीप सनगरे हे गेली 10-12 वर्ष वांद्रीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. यावर्षीही त्यांनी युएसए तसेच मुंबईतील दानशूर, देणगीदार यांच्यामार्फत देणगी स्वरुपात शैक्षणिक साहित्य गोळा करुन विद्यार्थ्यांना वाटप केले. विद्यार्थ्यांच्या शै. साहित्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले ते युएसएच्या सौ. मोनिका हावरे, रोहन हावरे, भक्ती होनावर यांनी. तसेच आरजू/अरीशा जतिन आरोंदेकर (शिवाजी पार्क ), कृपा आरोंदेकर ( शिवाजी पार्क ), राहुल खासनिस (सिंगापूर), शोभा राउत ( शिवाजी पार्क ), संदीप खापरे ( वाशी मिलींद धुमाळ ( विरार ), किसन दडस ( सी – वुड, नवी मुंबई ), विश्राम धुरी ( मुंबई ), संजय पाटोळे ( मुंबई ), उमेश सालीम ( मुंबई ), श्रेयांशी प्रदीप सनगरे ( मुंबई ), जनार्दन आंबेकर ( विरार ), विजय कानडे ( मुंबई ), संतोष कानडे यांनी या साहित्यासाठी भरघोस देणगी दिली.
या देणगीदारांनी अनेक असे अनेक समाजोपयोगी उपक्रम मुंबई येथे राबवले आहेत. परिस्थिती अभावी गोर गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहून नयेत, हा मुख्य उददेश डोळ्यासमोर ठेवून हे सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असल्याचे प्रदीप सनगरे यांनी सांगितले. वांद्री येथील ग्रामस्थांनी या देगणीदारांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छाही व्यक्त केल्या.
आदर्श शाळा नं. २ येथे पार पडलेल्या या कौतुक सोहळयात सरपंच विश्वनाथ मांजरेकर, गावकर गजानन सालीम, अनंत खापरे, सुरेंद्र सनगरे, लक्ष्मण शिगवण, लक्ष्मण पाताडे, मुंबईतील देणगीदार ग्रामस्थ, माजी सरपंच सुभाष सालीम, श्रीपत सालीम, दिलीप मयेकर, बाबू गांधी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक मुळ्ये, शिंदे, दीपक कींजळे, शाळेचे माजी शिक्षक मोरे, अंगणवाडी सेविका, सत्यवान मेस्त्री, संदीप सालीम, आशा प्रज्ञा डांगे, तसेच अमित सनगरे, वैभव सालीम, विराज सालीम, रोशन बदड, सोहन वेल्ये, सूरज सनगरे, सिद्धेश सनगरे यांचे सहकार्य मिळले. तसेच कार्यक्रमाला ग्रामस्थ, आजी – माजी विद्यार्थी, महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.