तेजामुळ्ये, रत्नागिरी
आपल्याला आपल्यात रमायचे असेल तर आपण निसर्ग शक्तीत मनमुराद मिसळून राहू शकतो ,,, त्याची साथ त्याची ऊर्जा काही तासात आपलं तादात्म्य निसर्गाप्रति होऊन जातं ,, आणि अशा वातावरणात आपल्या हातून झालेलं काम आपल्याला निखळ आनंद देतं. कुटी समोरील वाटेवरून लक्षात आलं असेलच इथे फक्त पायवाट ,, कोणत्याही वहानाला येण्याचा मार्ग नाही. किती छान आणि आदर्शवत आहे हे ठिकाण,,आपण शोधलं तर अजूनही अशी नैसर्गिक ऊर्जेची ठिकाणे सापडतील. वातावरणाची एक ताकद असते, म्हणूनच पूर्वीच्या काळी साधनेसाठी ऋषी मुनी एकांत निसर्गाच्या सानिध्यात रहात असावेत ,,, त्या ऊर्जेमुळे त्यांची कांती तेजस्वी होत असावी. अस हे ऊर्जेचं ठिकाण आपल्यातील ज्यांना इच्छा असेल त्या सर्वांना मिळावं. वनराई, पक्षी कुजन, ओढ्याची मंद गाज, वाऱ्याची सळसळ आणि मनाची प्रसन्नता ,,,,मनाची ताकद , प्रतिभेला मदत,,,