(रत्नागिरी)
सन २०२२ – २०२३ हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून कुलगुरु डॉ. संजय सावंत यांच्या संकल्पनेतून विद्यापीठातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र या कार्यालयामधुन गेल्या ५० वर्षात सेवानिवृत्त झालेले शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचा दिनांक ३ मार्च २०२३ रोजी सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम आयोजन करण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोलीचे कुलगुरु डॉ. संजय सावंत व संशोधन संचालक डॉ. संजय भावे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या सत्कार कार्यक्रमाकरिता गेल्या ५० वर्षात सेवानिवृत्त झालेले शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रकाश शिनगारे उपस्थित होते. यावेळी गेल्या ५० वर्षात सेवानिवृत्त झालेले डॉ. शेखर कोवळे, डॉ. विजय जोशी, डॉ. विट्ठल जोशी, डॉ. मनोहर चांडगे, श्री. सुरेश पवार, श्री. एकनाथ पंड्ये, श्री. विजय शिंदे, श्री. विरकुमार शेट्ये, श्री. रामभाऊ पालशेतकर हे उपस्थित होते. यावेळी कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
माजी संशोधन केंद्र प्रमुख आणि वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. विजय जोशी आणि मत्स्यालय टाकी परिचर श्री. एकनाथ पंड्ये यांनी आपल्या कार्यकाळातील कामाची आठवण करून मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे सहाय्यक संशोधन अधिकारी श्री कल्पेश शिंदे यांनी केले. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेन्द्र चोगले, अभिरक्षक डॉ. संतोष मेतर आणि सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. सचिन साटम हे उपस्थितीत होते. हा कर्यक्रम यशस्वी करण्यास श्रीमती जाई साळवी, श्री. सचिन पावसकर, श्री. रमेश सावर्डेकर, श्री. मंगेश नांदगावकर, श्री. महेश किल्लेकर, श्री. दिनेश कुबल, श्री. मनिष शिंदे, श्री. मुकुंद देवूरकर, श्रीमती रेश्मा तेरवणकर, श्री. राजेंद्र कडव, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्री. विवेक धुमाळ, श्री. प्रविण गायकवाड तसेच कंत्राटी कर्मचारी श्री. स्वप्नील अलीम, श्री. तेजस जोशी, श्री. अभिजित मयेकर, श्री. उल्हास पेडणेकर आणि श्री. योगेश पिळणकर यांनी विशेष मेहनत घेतली.