(देवरूख/सुरेश सप्रे)
बेळगांव येथील नँशनल रुलर डेव्हलपमेंट फौंडेशन व हेल्थ अँण्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांचे तर्फे कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या राज्यातील सामाजिक, शैक्षणीक, वैद्यकीय, सहकार, बांधकाम आधी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना संस्था व व्यक्ती यांना अंतरराज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
साखरपा भागातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच साखरपा गावचे जनतेतून निवडून आलेले सरपंच संदेश तथा बापू शेट्ये यांना हा प्रतिष्ठेचा अंतरराज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा ८आक्टोबरला बेळगाव येथे विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
बापू शेट्ये हे अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. ते तालुक्यातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र असलेल्या मार्लेश्वर देवस्थानच्या मकर संक्रातीला संपन्न होत असलेल्या मार्लेश्वर – गिरीजा विवाह सोहळ्यातील देवी गिराजा देवस्थानचे मानकरी असून ते साखरपा परिसरासह तालुक्यात शैक्षणिक संस्था, विविध सेवा सोसायटी, मातृमंदिर संस्था, क्रीडा मंडळ आदिं संस्थामधे काम करतात. ते रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही निवडून आले होते.
या कार्याची दखल घेवून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करणेत आली. त्यांना हा पुरस्कार मिळालेने त्यांचे माजी राज्य मंत्री रविंद्र माने, आम. शेखर निकम, प्रा. आबा सावंत, युवा नेते व भडकंबा सरपंच बापू शिंदे, माजी सभापती जया माने, जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी समाज कल्याण सभापती सौ. रजनी चिंगळे, मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजू सुर्वे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विवेक शेरे, हनिफ हरचिरकर, मातृमंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, भाजपचे युवा नेते अमित केतकर, शिरूशेठ कबनुरकर, बाळकृष्ण सकपाळ, पत्रकार संदेश सप्रे, सोळजाई देवस्थानचे अध्यक्ष शरद गांधी, संतोष लाड, आदिंनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.