(रत्नागिरी)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-कोंडगाव येथे तरूणाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या संशयिताचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल़ा. सुशांत संजय सुर्वे (26, ऱा साखरपा, सुर्वेवाडी) असे संशयिताचे नाव आह़े. त्याच्याविरूद्ध देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली होत़ी. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी जामीन अर्जावर निकाल दिल़ा तर सरकार पक्षाकडून ऍड़ अनिरूद्ध फणसेकर यांनी काम पाहिल़े.
गुन्ह्यातील माहितीनुसार साखरपा-कोंडगाव तिठा येथे 16 एपिल 2023 रोजी कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या हार-जीत वरून वाद उफाळून आला होत़ा. यावेळी संजय सुर्वे, सुशांत सुर्वे व पप्या लोध यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली होत़ी. याचा राग मनात ठेवून 18 एपिल 2023 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास कोंडगाव येथे सुशांत सुर्वे याने तरूणाला मारहाण केली, अशी तक्रार देवरूख पोलिसांत दाखल करण्यात आली होत़ी.
त्यानुसार पोलिसांनी सुशांत सुर्वे याच्याविरूद्ध भादंवि कलम 326, 143, 147, 148, 149, 323, 504 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4 व 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा होता. त्याचप्रमाणे 21 एपिल 2023 रोजी सुशांत सुर्वे याला पोलिसांकडून अटक करण्यात आल़ी. दरम्यान आपल्याला जामीन मिळावा, यासाठी सुशांत सुर्वे याच्याकडून न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होत़ा. यावेळी सुर्वे यांच्या वकिलांनी न्यायालयापुढे सांगितले की, तक्रारदार यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली नाह़ी. तसेच सुर्वे हा पोलिसांना तपास कामात सहकार्य करण्यास तयार आह़े यासाठी त्याला जामीन मंजूर करावा, अशी विनंती न्यायालयाला केल़ी. तर सरकारी वकिलांनी न्यायालयापुढे सांगितले की, सुर्वे याने आपले व वडिलांचे वर्चस्व दाखवण्यासाठी अन्य आरोपींच्या मदतीने तक्रारदार यांना मारहाण केल़ी.
पोलिसांचे तपासकाम अद्याप पूर्ण झालेले नाही तसेच आरोपींची ओळखपरेड घेणे अद्याप बाकी आह़े, त्यामुळे जामीन अर्ज नामंजूर करावा, अशी विनंती न्यायायालयापुढे केल़ी. दरम्यान दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर सत्र न्यायालयाने सुर्वे याचा जामीन अर्ज फेटाळून लावल़ा.