(देवरुख / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे अॅम्ब्युलन्स चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत भंडारवाडी येथे एका बैलाला धडक दिली. या धडकेत काळया रंगाच्या बैलाचा डाव पाय फ्रॅक्चर झाला असून उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघात प्रकरणी अॅम्ब्युलन्स चालक गणेश रामदास मुळये (33, एस. व्ही. रोड, राजेंद्रनगर रत्नागिरी) याच्यावर भादविकलम 429 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.