🟧 साक्षी क्रिएशन चिपळूण निर्मित, आणि चित्रांगण मुंबई प्रकाशित मराठी लघुपट ‘परीकथा’चे चित्रीकरण परशुराम आणि सोनगाव येथे पार पडले.
श्री सागर महाडिक निर्मित आणि श्री विलास पाटील दिग्दर्शित व श्री नंदा आचरेकर लिखित परीकथा या लघुपटाचे चित्रीकरण नुकतेच परशुराम मंदिर परिसर आणि सोनगाव भोईवाडी आणि कांदळवन येथे नुकतेच पार पडले. या लघुपटात बालकलाकार म्हणून परिणीता, सागर महाडिकही आपले नशीब अजमावत आहे. तिच्यासोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय १०५ पुरस्कार विजेता बालकलाकार कुमार आर्यन विलास पाटील काम करीत आहे. तसेच सोनाली घडवले, दिपाली पाटील, नंदा आचरेकर, मंगेश डोंगरे, भूषण शेटे मेघा शेट्टी, उदय करंजकर, मनस्वी घडशी, मुक्ता बापट, निलेश आवळे, किरण पाटील, रीयांश कुडाळकर, रिया शिंदे,सौ कुडाळकर, अमित जोशी आदि कलाकार काम करीत आहेत. कॅमेरामन म्हणून श्री कौस्तुभ पाध्ये यांनी काम पाहिले आहे तर सहदिग्दर्शक म्हणून श्री धोपटकर सर यांनी काम पाहिले आहे. तसेच मेकअप मन म्हणून श्री मंगेश डोंगरे यांनी काम केले आहे.
🟧 हा लघुपट एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात सामील होईल.
परीकथा लघुपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त परशुराम देवस्थानचे विश्वस्त श्री अभयदादा सहस्त्रबुद्धे, प्राचार्या सौ कुलकर्णी मॅडम, जयदीप जोशी, सागर महाडिक, विलास पाटील, नंदा आचरेकर, धोपटकर सर, कौस्तुभ पाध्ये सर, श्री खापले सर, सोनाली महाडिक, स्वरा महाडिक याचे हस्ते पार पडला.
🟧 या लघुपटाच्या चित्रीकरणासाठी अनेक मान्यवरांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !