(मुंबई / किशोर गावडे)
दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागात साक्षी नावाच्या एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. 16 वर्षीय साक्षीला साहिलनं 21 वेळा चाकूनं भोसकलं. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्यानं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साक्षीच्या डोक्यावर शेजारीच असलेल्या दगडानंही निर्घृणपणे हल्ला केला. आरोपी साहिलनं साक्षीचं डोकं दगडानं ठेचलं माणुसकीला काळीमा फासणारी बाब म्हणजे ही घटना भररस्त्यात घडली. यावेळ रस्त्यावर माणसांची रहादारी होती. मात्र, कुणीही साक्षीच्या मदतीला धावलं नाही. कुणीही साहिलला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. साहिलला दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातून अटकही केली. आरोपीनं चौकशी दरम्यान गुन्ह्याबद्दल त्यानं कोणताही पश्चात्ताप झालेला नाही. या घटनेचा निषेध करण्यासाठी भांडुप पश्चिम येथील युवक व युवतींनी एकत्र येऊन कँडल मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
भांडुप पश्चिमेच्या व्हिलेज रोड येथून सांयकाळी कॅडल मोर्चाला सुरुवात झाली. अनेक युवक युवतीं हातात निषेधाचे फलक, घेवून सहभागी झाले होते. निषेध फलकांच्या माध्यमातून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व कु. पौर्णिमा मकासरे व कु अमनप्रीत कौर यांनी केले. या साठी विशेष सहकार्य सुरेंद्र राजन गावडे, स्वप्नील तावडे,अपर्णा सागर गावडे, प्रविण जाधव यांनी केले.
या घटनेनंतर महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याचा निषेध करण्यासाठी कँडेल मोर्चाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला. कॅडल मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथे आल्यानंतर सर्व मेणबत्त्या तलावाच्या चौथऱ्यावर ठेवून पीडित साक्षीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कँडल मोर्चाची सांगता करण्यात आली.
मोर्चामध्ये राजेश ठाकूर,सचिन पाटणकर,अजय कोळसेकर, कल्पेश तेली, सुधीर परब, मनाली बुवा, सुनील शिंदे, प्रमोद काटे आदी सहभागी झाले होते. या मोर्चाला भांडुप पोलिस प्रशासनाने देखील सहकार्य केले. आरोपी साहिलला फाशीची शिक्षा एका महिन्यात देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.