(निवोशी/गुहागर – उदय दणदणे)
कोकणातील लोकप्रिय नमन व जाखडी नृत्य (शक्ती-तुरा ) या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या लोककला प्रामुख्याने पुरुष मंडळी सादर करत आले आहेत. मात्र त्यात कालपरत्वे बदल होत आज या लोककलेत मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग ही सहभागी होत असून जाखडी नृत्यात महिला शाहिर ही आपली कोकण कला संस्कृती जोपासण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. भारत देशाभिमुख स्त्री-पुरुष समानतेचा महाराष्ट्रात स्त्री-नारीसाठी नक्कीच अभिमानास्पद कार्य आहे.
जाखडी नृत्यात प्रामुख्याने महिला शाहिरांना प्राधान्य देणारे कोकणातील नावलौकिक असं साई श्रद्धा कलापथक ( कानसे ग्रुप ) मुबंई या संस्थेचे संस्थापक -श्री संदिप धोंडू कानसे त्यांचे सहकारी श्री सुभाष बांबरकर यांच्या सहकार्याने कानसे ग्रुपच्या वतीने सोमवार दि. २५ जुलै २०२२ रोजी रात्रौ.०८-३० वा मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले -पू मुंबई, येथे या मोसमातील पहिला महिला-पुरुष शक्ती-तुरा सामना कॅसेट फेम- कव्वाली गायिका शाहिर- दिपाली शिंदे ( रायगड) व महाराष्ट्र लोकरत्न पुरस्कार सन्मानित, सिनेपार्श्व गायक शाहिर- एकनाथ माळी (पनवेल) या दोन सुप्रसिद्ध शाहिरांमध्ये ही जुगलबंदी होणार आहे.
अधिक माहितीसाठी संदिप कानसे -९५९४६२७३३४ सुभाष बांबरकर-९८९२३८४४७१ अमोल भातडे-९०८२३९७८०६ यांच्याकडे संपर्क साधावा. तरी सदर महिला-पुरुष शक्ती-तुरा कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांडून करण्यात आले आहे.