(चिपळूण)
देशासाठी ज्या इंदिराजी गांधी यांना बलिदान द्यावे लागले, त्या.इंदिरा गांधी यांचे सांस्कृतिक केंद्राला नाव आहे, याचे तरी भान ठेवा. या सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनाला माजी आमदार कै. नानासाहेब जोशी यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री वसंत साठे यांना आणले होते, असे माजी सभापती शौकत मुकादम यांनी सांगून सोळा वर्ष केंद्र बंद असल्याबाबत संताप व्यक्त केला आहे.सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या चिपळूणच्या सांस्कृतिक केंद्राचा विषय निघाल्यानंतर आम्हा सर्वांना मान खाली घालावी लागते.
१६ वर्षे सांस्कृतिक केंद्र बंद आहे. त्याच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी अंदाजे ९ कोटी रूपये खर्च झाले आहेत. जिल्हाधिकारी किंवा आयुक्त यांच्याकडे कोणी तक्रारी केली असतील तर त्याचा निवाडा, पाठपुरावा करून तक्रारदारांनी त्यांचा निवाडा करून घ्यावा नगर परिषद प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी काय केले, याबाबत सर्व जनतेला माहिती आहे. तक्रारदारांचा हक्क अबाधित ठेवून आता या विषयावर तातडीने मार्ग काढून सांस्कृतिक केंद्र पुन्हा सुरू करावे,अशी चिपळूणच्या जनतेची मागणी आहे असे माजी सभापती शौकत मुकादम यांनी सांगितले.
या विषयासंदर्भात मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही श्री. मुकादम यांनी बोलताना सांगितले.