(संगमेश्वर / प्रतिनिधी)
आपल्या कलाकृतीला पारितोषिक मिळणे , अत्यंत अभिमानास्पद असले तरी पारितोषिकाने हुरळून न जाता विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सराव करावा आणि आपल्या कलेवर प्रभुत्व मिळवावे असे आवाहन चित्रकार जयसिंग पैलवान यांनी केले.
सह्याद्री कला महाविद्यालयाच्या तिसाव्या वार्षिक कलाप्रदर्शनाचे उदघाटन चित्रकार जयसिंग पैलवान यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार एस निंबाळकर , सूर्यकांत होळकर, संपत नायकवडी, विजय टिपुगडे, नागेश हंकारे, उत्तम साठे,ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, महेश महाडिक हे उपस्थित होते.
या उदघाट्न प्रसंगी माजी कलाशिक्षक तुकाराम दरवजकर बोलताना म्हणाले की, स्वर्गीय. गोविंदरावजी निकम यांच्या भेटी प्रसंगी त्यांनी माझे कौतुक केले. त्यांच्या विचारात सखोलता, दूरदृष्टी होती.त्यामुळेच एवढी शिक्षण संस्था नावारूपास आली प्रा. प्रकाश राजेशिर्के सर यांनी देखील आभार मानतो की मला हा आदर्श कलाशिक्षक सन्मान दिला.तसेच मी या कलाहाविद्यालयासाठी फुल न फुलाची पाकळी म्हणून दहाहजर रुपये जाहीर केले .
उत्तम साठे बोलताना म्हणाले की, कलाकृतींचे परीक्षण करताना खूप कठीण गेले. एवढ्या कलाकृती उत्तम प्रतीच्या आहेत. यापेक्षाही कलाकृती सुंदर प्रतिच्या करा अशा शुभेच्छा देतो. चित्रकार एस.निंबाळकर बोलताना म्हणाले की, ज्यांना पारितोषिक मिळाले नाही त्यांनी नाराज न होता नवीन उमेदीने काम करण्याचे आवाहन केले . तसेच या कला प्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदजी निकम कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या तसेच सामाजिक बांधिलकी जपणार्या कलाकाराला या पुरस्काराने गौरवण्यात येते यावर्षी हा गौरव मालगुंड रत्नागिरी मधील कलाशिक्षक तुकाराम मारुती दरवजकर यांना लाभला.
तसेच या कला प्रदर्शनाचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे प्रदर्शनातील कला विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहण्याचा व विकत घेण्याचा आनंद या कला जत्रेत कलारसिकांना घेता येणार आहे.या प्रदर्शनात शंभरहून अधिक कलाकारांच्या ६०० कलाकृती मांडल्या आहेत. या कलाप्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन व कौतुकाची थाप म्हणून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यावर्षी पुरस्कारासाठी निवडले गेलेले विद्यार्थी
मूलभत अभ्यासक्रम -प्रथम पारितोषिक -शुभम जाधव द्वितीय पारितोषिक- कृतिका खामकर , उत्तेजनार्थ पारितोषिक-अविष्कार मोहिते , उत्तेजनार्थ पारितोषिक-चैतन्य मांडवकर कलाशिक्षक पदविका – प्रथम पारितोषिक-सौरभ साठे , द्वितीय पारितोषिक-सुमित गेल्ये , उत्तेजनार्थ पारितोषिक-चिन्मय वडपकर , उत्तेजनार्थ पारितोषिक-भूषण वेलये.रेखा व रंगकाला विभाग – प्रथम पारितोषिक-सायली कदम , द्वितीय पारितोषिक-तुळशी भुवड , उत्तेजनार्थ पारितोषिक-करण आदवडे , उत्तेजनार्थ पारितोषिक-पुष्कराज देवरुखकर
शिल्प व प्रतिमानबंध कला- प्रथम पारितोषिक -स्वराज कदम, द्वितीय पारितोषिक -प्रितेश गोणबरे , उत्तेजनार्थ पारितोषिक. भूषण थवी , उत्तेजनार्थ पारितोषिक-स्वयम वर्दम , उत्कृष्ट निसर्गचित्रण कलाकृती. करण आडवडे , उत्कृष्ट सृजनात्मक कलाकृती. ईशा राजेशिर्के , उत्कृष्ट रेखांकन पारितोषिक. सुजल निवाते , उत्कृष्ट व्यक्तीचित्रण कलाकृती. प्रतिक लोंढे , उत्कृष्ट त्रिमित संकल्प (मूलभूत अभ्यासक्रम) -राकेश भेकरे , उत्कृष्ट व्यक्तिचित्रं कलाकृती-सायली कदम , उत्कृष्ट रचना चित्रण कलाकृती -ईशा राजेशिर्के
सर्वोत्कृष्ट मुद्रा चित्रण कलाकृती- प्राची जोगळेकर,
उत्कृष्ट सृजनात्मक व्यक्तिचित्रण चित्रकृती -अभिषेक बाटले, स्वराज कदम, प्रदिप कुमार, सर्वोत्कृष्ट सृजनात्मक कलाकृती -अध्वज चव्हाण
मूलभूत अभ्यासक्रम परीक्षेत कला महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पारितोषिक-सार्थक आदवडे , कला शिक्षक पदविका परीक्षेत कला महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पारितोषिक-सुयश शिगवण,
रेखा व रंगकला डिप्लोमा विभाग परीक्षेत कला महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पारितोषिक -ऋतिका शिरकर,प्रसाद धनावडे.
शिल्प व प्रतिमान बंद कला परीक्षेत कला महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पारितोषिक-शुभम पांचाळ शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम आदर्श विद्यार्थी पारितोषिक. तुषार पांचाळ. प्रकाश अर्जुन राजेशिर्के पुरस्कृत स्वर्गीय सौ प्रभावती बाई बरांजि राजेशिर्के कला महाविद्यालयातून आदर्श विद्यार्थिनी.सायली कदम .
कला शिक्षक पदविका अभ्यासक्रमातील आदर्श विद्यार्थिनी स्वर्गीय श्रीमती सिद्धी सुधीर मोरे स्मरणार्थ -भक्ती देशमुख
या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात चित्रकार श्री. एस निंबाळकर, सूर्यकांत होळकर, संपत नायकवडीमा. विजय टिपुगडे, नागेश हंकारे, उत्तम साठे यांनी आपले प्रात्यक्षिक सादर केले.या प्रदर्शनाचे अजून एक खास आकर्षण म्हणजे या कला प्रदर्शनाचा व विक्रीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक शिवाजी यादव यांनी केली आहे.