(चिपळूण / ओंकार रेळेकर)
आपल्या कोकणातील मुलांनी विविध क्षेत्रात शिक्षण घेऊन आपल्या महाविद्यालयाचे नाव उंचवावे देश सेवेसोबताच उच्च पदावर नोकरी करून कुटुंबाला आधार द्यावा माजी चीफ इंजिनियर पदी बढती झाली असली तरीही माझे पाय जमिनीवर आहेत. मी सदैव येथील मुलांना मरीन इंड्रस्टीमध्ये करीयर करण्यासाठी सतत मार्गदर्शन करीत राहणार मुलांनीही मोठ्या उत्साहाने या क्षेत्रात शिक्षण घेऊन आपल्यातील कलागुण दाखवले पाहिजेत असे प्रतिपादन मर्चंट नेव्ही चीफ इंजिनियर इम्रान कोंडकरी यांनी केले.
तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचालित सह्याद्री पॉलिटेक्निक मध्ये मर्चंट अधिकारी इम्रान कोंडकरी यांचे महाविद्यालयीन मुलांकरीता नुकतेच करीयर मार्गदर्शन आणि कोंडकरी यांची थेट मुलाखत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी मुलांना मार्गदर्शन करतांना बोलताना इम्रान कोंडकरी बोलत होते.
सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचालित सह्याद्री पॉलिटेक्निक मध्ये मर्चंट नेव्ही ऑफिसर आणि सामाजिक कार्यकर्ते श्री.इम्रान कोंडकरी यांची चीफ इंजिनीअर पदी बढती झाल्याबद्दल भव्य सत्कार समारंभ प्राचार्य श्री मंगेश भोसले , विभाग प्रमुख खानविलकर आणि इंजिनीअरिंग च्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. यावेळी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी इम्रान कोंडकरी यांची प्रकट मुलाखत घेऊन करियर बाबत विविध प्रश्नन विचारले.इम्रान कोंडकरी यांनी शिक्षण महर्षि, गुरूवर्य, स्वर्गीय गोविंदराव निकम यांना अभिवादन करून, त्यांच्या कार्याला अभिवादन करून मुलाखतीला सुरुवात केली.
इम्रान कोंडकरी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना खुलासेवार आणि समाधानकारक उत्तरे दिली.भविष्यात मरीन इंडस्ट्री मध्ये योग्य करियर घडविण्यासाठी इम्रान कोंडकरी यांनी केलेले मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना खूप मोलाचे ठरेल आणि यापुढे ही आमच्या विद्यार्थ्यांना मरीन इंडस्ट्री मध्ये लागणारे मार्गदर्शन करण्यासाठी इम्रान कोंडकरी यांचे मार्गदर्शन शिबीर आम्ही आमच्या पॉलिटेक्निक मध्ये आयोजित करत राहू अशी भावना प्राचार्य श्री मंगेश भोसले यांनी व्यक्त केली. इम्रान कोंडकरी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी सदैव तयार असतोच आणि यापुढे ही नेहमीच तयार असेन कारण या कामाला नेहमीच माझे प्रथम प्राधान्य राहील अशी ग्वाही दिली. यावेळी शब्बीर राजीवटे,जहीर कुंडलिक, बरकत पाते, राहील मणियार, सफदर खान, इम्रान खतीब आदी मान्यवर उपस्थित होते
फोटो : इम्रान कोंडकरी यांची चीफ इंजिनीअर पदी बढती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना मंगेश भोसले छायाचित्रात दिसत आहे (छाया : ओंकार रेळेकर)