(प्रतिनिधी / संगमेश्वर)
देशाच्या ७५व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संगमेश्वर पोलीस ठाण्याच्यावतीने विविध राष्ट्रसेवाभावी व मानव विकासाचे उपक्रम संगमेश्वर पोलीस ठाण्याच्यावतीने यावर्षी राबवण्यात आले. देशाच्या या विशेष स्वातंत्र्यदिनानिमित्त संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.उदय झावरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख यांनी तालुक्यात विविध कार्यक्रमाला भेट दिल्या व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये जेष्ठ नागरिक संघाचा भव्य मेळावा धामणी येथे घेण्यात आला. या मेळाव्याला बहुसंख्येने जेष्ठ नागरिक,माजी सैनिक व त्यांच्या परिवारातील मंडळींनी उपस्थिती दर्शविली होती. हा मेळावा जिल्ह्यात लक्षणीय ठरला. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग तसेच आत्ताच्या विविध अधिकाऱ्यांनी यावेळी मान्यवर म्हणून उपस्थिती दर्शविली होती. त्याचप्रमाणे लायन्स क्लब ऑफ संगमेश्वर व पोलीस ठाणे संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅरेथॉन स्पर्धा छोटा गट, मोठा गट व खुला गट घेण्यात आली होती. संगमेश्वर एसटी स्टँडच्या पाठीमागे देवरुख रोडला ही स्पर्धा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग डी.वाय.एस.पी सदाशिव वाघमारे लायन्स क्लब अध्यक्ष सतेज पटेल व कमिटी, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे,सहाय्यक पोलीस निरीक्षण प्रवीण देशमुख, गुप्त पोलीस अंमलदार किशोर जोयशी,महिला पोलीस अंमलदार तसेच विविध पदाचे व्यापारी पदाधिकारी व पत्रकार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विविध जिल्ह्यातून आलेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची शासनस्तरावर प्रशंसा करण्यात आली. खेळाडूंनी यातून समाधान व आनंद प्राप्त केला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. संगमेश्वर -निढळेवाडी येथील प्रसिद्ध युवा गायिका कु.समीक्षा मुरलीधर वाडकर हिने देशभक्तीपर गीते गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली. योजकांच्या वतीने कु.समीक्षा हिचा सन्मानचिन्ह देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग व डी.वाय.एस.पी वाघमारे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने सहाय्यक पोलीस प्रवीण देशमुख यांनी नावडी-अंब्रेवाडी माजी सैनिक स्व.हरिभाऊ केशव अंब्रे यांच्या वीरपत्नी श्रीमती.शालिनीताई हरिभाऊ अंब्रे यांच्या परिवाराची भेट घेतली व त्यांच्या कुटुंबासमवेत वार्तालाभ केला. शालिनीताई अंब्रे यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. व त्यांची मुलाखत घेऊन सैन्यकाळातील खडतर जीवन व जुन्या आठवणींना उजाळा दिला. अंब्रे यांच्या परिवारात त्यांचा मुलगा दिनेश अंब्रे सलून व्यवसायिक,वरिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आहेत. सून सौ.शितल अंब्रे या अंगणवाडी सेविका आहेत. नातू हरीश व ओंकार तर नातसून ज्ञानसी या गृहिणी आहेत व पणती स्मित अंब्रे आहे.मोठी मुलगी विवाहित असून (नेवरे,रत्नागिरी) गावात तर शुभांगी हरिश्चंद्र चव्हाण आरोग्य विषयक क्षेत्रात काम करतात.कनिष्ठ मुलगी सौ.भारती उपरे (पालवण, चिपळूण) या गृहिणी असा त्यांचा परिवार आहे. हरिभाऊ अंब्रे हे जादूचे प्रयोग करायचे.विविध शाळांमधून त्यांनी प्रयोग केले. मिलिटरीत असताना हिमाचल प्रदेशामध्ये बर्फात पाय अडकल्यामुळे त्यांना निवृत्ती घ्यावी लागली.
कै. हरिभाऊ केशव अंब्रे हे शासकीय सैन्य दलात असताना त्यांनी अत्यंत उत्तम असे कर्तव्य बजावले असून यासाठी त्या संग्राम पदक, 25 वे स्वातंत्र्यपदक, सैन्य सेवा पदक, उत्तम सेवा पदक, नव वर्षे ज्येष्ठ सेवा पदक, रक्षा पदक (1965) अशी पदके बहाल करण्यात आली असून एक कर्तव्यदक्ष सैनिक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. तसेच ते उत्कृष्ट जादूगार होते.
सेवानिवृत्त झाल्यानंतर 1994 साली त्यांचे आकस्मित निधन झाले. त्यावेळी त्यांची लहान मुले होती. परंतु त्यांच्या पश्चात अन्य कोणाचीही मदत नसताना छोटे उदीम व्यवसाय करून कोणत्याही प्रकारे न डगमगता आलेल्या संकटांना सामोरे जाऊन शालिनीताईंनी आपल्या संसाराचा गाडा त्यांनी नेटाने पुढे चालवून आपल्या मुलांच्या जमतील तेवढा गरजा पुरवून व त्यांना सामाजिक भान, सुसंस्कार देऊन वडिलांची उणीव भासवून न देता मुलांचे येतोच संगोपन करून व त्यांना सुसंस्कारित करून म्हणजेच सुजाण पालकत्व , माॅं साहेब, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपल्या मुलांची उत्तम ढळणगठण केली आहे. श्रीमती शालिनीताई अंब्रे यांचा यातून अत्यंत त्याग , दया, परोपकार व सेवाभावी स्वभाव दिसून येतो.आता त्या संत निरंकारी मंडळाच्या युगदृष्ट्या बाबा हरिदेव जी महाराज यांच्या अनुगृहीत आहेत. जास्त शालिनीताईंचा दिनांक 26 मे 2019 रोजी संगमेश्वर येथील संगम जेष्ठ नागरिक संघ संगमेश्वर परिसर संगमेश्वर यांनी फौजी परिवाराची दखल घेऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संघाच्या अध्यक्ष भिकाजी साळवी व कमिटी यांच्या हस्ते सन्मान केला. यावेळी पत्रकार सर्व अर्चिता कोकाटे (माध्यमिक शिक्षिका), सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शेट्ये, निवृत्त मंडळ अधिकारी श्री पवार, विश्व समता कला मंचाचे संस्थापक अध्यक्ष श्री मनोज जाधव सर तसेच बहुसंख्येने उपस्थित ग्रामस्थ व नातेवाईक व व्यापारी विनय शेती यांच्या उपस्थितीत हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला.