( रत्नागिरी )
सहकार हा मुळातच पिंड असलेले सुनील साळवी को -ऑप. बँक एम्प्लॉईज संघटनेत कार्याध्यक्ष पदावर आपल्या कर्तुत्वाने व कुशल नेतृत्वाने विराजमान आहेत. आपल्या कार्याध्यक्ष पदाच्या कालावधीत अनेक धडाडीचे निर्णय घेत त्यांनी आपले कर्तुत्व वेळोवेळी सिद्ध केले आहे. “एक नेता- एक निर्णय” ही संकल्पना राबवत सहकार क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार आनंदराव अडसूळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आजवर कायम कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देत कार्याध्यक्ष या पदाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. को -ऑप. बँक एम्प्लॉईज संघटनेत अडसूळ साहेब यांनी दिलेला निर्णय त्यांचेसाठी अंतिम असतो. यापुढेही संघटनेच्या माध्यमातून काम करताना त्यांचे मार्गदर्शन व आशिर्वाद घेऊनच आपली वाटचाल राहणार आहे. भविष्यातही संघटनेचे काम करताना त्यांच्या सल्ल्याने काम केले जाणार असून, “एक नेता एक निर्णय” ही संकल्पना अधिक दृढ केली जाणार असल्याचे श्री. साळवी यांनी स्पष्ट केले.
सहकारी बँका टिकल्या पाहिजेत असा दृष्टीकोन सातत्याने श्री. अडसूळ साहेब याचा राहिला आहे. आजच्या घडीला सहकारी बँक क्षेत्रात श्री. अडसूळ साहेब यांच्यासारखा सक्षम नेता नाही. रिझर्व्ह बँकेच्या कठोर निर्णया विरोधात बोलू शकणारे एकमेव नेता म्हणजे श्री. अडसूळ साहेब आहेत. सहकारी बँका जगल्या पाहिजेत, त्या सक्षम झाल्या पाहिजेत असा प्रयत्न त्यांचा नेहमीच राहिला आहे. श्री. अडसूळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सहकारी बँक क्षेत्रात भरीव काम करण्याचा प्रयत्न आपला असेल, असे श्री. साळवी यांनी सांगितले.
अभ्यासू वृत्ती, सहकार क्षेत्रातील जाणकार असणारे श्री. साळवी यांनी सर्वांना सोबत घेत को-ऑप बँक एम्प्लॉईज संघटनेला एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवण्याचे काम केले आहे. धडाडी वृत्ती आणि उपजत गुणामुळे को – ऑप बँक्स एम्प्लॉईज संघटनेतील कार्याध्यक्षपदी ते विराजमान झाले असून, या पदाच्या माध्यमातून विविध को – ऑप . बँकांतील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे.
रत्नागिरी फणसोप हे मूळगाव असलेल्या सुनील साळवी हे नोकरी निमित्ताने मुंबईत असले तरी त्यांचे संबंध व जवळीक कायम रत्नागिरीशी राहिली आहे. सातत्याने रत्नागिरीशी संपर्क ठेवत त्यांनी सहकार क्षेत्रातील बँकामधील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यावर भर दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडी-अडचणी सोडवण्यासाठी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली को – ऑप . बँक्स एम्प्लॉईज संघटनेची स्थापना करण्यात आली. कोकणात आज या संघटनेचे काम अविरतपणे सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन करार निश्चित करणे, कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात कायदेशीर लढा देणे या बाबी प्रामुख्याने संघटनेच्या माध्यमातून केल्या जात आहेत. गेली अनेक वर्ष या संघटनेच्या माध्यमातून हे प्रश्न सातत्याने सोडवण्यात आले आहेत. त्यासाठी माजी खासदार श्री अडसूळ यांनी कार्यक्षम पदाधिकाऱ्यांची चांगली फळी निर्माण करण्याचे काम केले. त्यात राज्यातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींचा समावेश असून, रत्नागिरीचे रहिवासी असलेले सुनील साळवी हे त्यांच्यातील एक आहेत. माजी खासदार श्री. अडसूळ यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांच्यावर कार्याध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली असून या पदाला योग्य तो न्याय देऊन आजवर प्रामाणिक काम श्री. साळवी यांनी केले आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची योग्य रितीने सोडवणूक करून त्यांना उचित न्याय देण्याचे काम त्यांनी सक्षमपणे केले आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गातही त्यांच्याबद्दल आज आदराची भावना आहे.
श्री. साळवी यांचे शालेय शिक्षण रत्नागिरीत झाले. गोगटे – जोगळेकर महाविद्यालयातून बीए ची पदवी घेतल्यानंतर ते रत्नागिरीतील एसटी बँकेमध्ये १९८२ मध्ये लिपिक पदावर रूजू झाले. सध्या ते मुंबईतील एस. टी. को – ऑप. बँकेत कार्यरत आहेत. याठिकाणी काम करत असताना त्यांनी को – ऑप . बँक्स एम्प्लॉईज युनियनची माहिती घेतली. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कामापासून प्रेरणा घेत ते या संघटनेत सहभागी होत सक्रीय झाले. तेथूनत्यांचा आलेख नेहमीच चढता राहिला. तेथे त्यांची प्रथम युनिट सहसचिव पदावर नियुक्ती झाली. १९९१ ला युनियनच्या ऑर्गनाईज सेक्रेटरी पदावर नियुक्ती झाली. या पदावर त्यांनी २००५ पर्यंत काम केले. या कालावधीत तीन वेतन करार करण्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यानंतर माजी खासदार अडसूळ यांच्यामुळे ते एसटी बँकेच्या संचालक प्रतिनिधी पदावर ‘संचालक’ म्हणून ते काम करू लागले. कामाची योग्य पद्धत व प्रचंड अभ्यास यामुळे त्यांना मंडळावर काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत कर्मचारी संघटनेचे त्यांचे काम लक्षात घेऊन २००५ मध्ये मुंबई युनियनच्या मुख्य कार्यकारीणीच्या उपाध्यक्षपदी, तर २०१० मध्ये त्यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तत्कालीन पदाधिकारी सी. पी. साळवी यांच्याबरोबर सुनील साळवी यांनी संघटनेचे नेतृत्व कले. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी विविध आंदोलनातही त्यांचा सहभाग राहिला. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिला. बँकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन करताना बँकेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी त्यांचे सकारात्मक व प्रामाणिक प्रयत्न राहिले. ‘एक नेता एक यूनियन’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवत त्यांनी आपल्या धडाका सिद्ध केला. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे हे त्यांचे कायम ध्येय असल्याचे ते आवर्जून सांगतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंदराव अडसूळ साहेब यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर आहे. को – ऑप बँक्स एम्प्लॉईजमधील एक कुशल संघटक म्हणून त्यांची आजवर ओळख आहे.
असे आमचे धडाडीचे कार्याध्यक्ष श्री. सुनील साळवी यांचा आज ५९ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्या सर्व सहकाऱ्यांकडून हार्दिक शुभेच्छा.
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
येणाऱ्या आयुष्यात प्रत्येक दिवस,
आनंदाने उत्साहाने उजळून निघावा !
आरोग्य निरोगी असावे, यश भरपूर मिळावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!
साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा …
श्री. जितेंद्र साळवी, जॉइंट जनरल सेक्रेटरी,
को – ऑप, बँक्सएम्प्लॉइज यूनियन, रत्नागिरी